नवी दिल्ली - भारताने 2022 मध्ये देशाचा पासपोर्ट अधिक सक्षम केला आहे. जगभरातील सर्वात मजबूत पासपोर्टमध्येभारताच्या पासपोर्टचे 90 वे स्थान होते. मात्र, यंदाच्यावर्षी हे स्थान 6 अंकांनी आणखी पुढे आलं असून ते 84 व्या स्थानावर पोहोचले आहे. त्यामुळे, भारतीय पासपोर्ट तब्बल 59 देशांपर्यंत पोहोचला असून या देशात भारतीय नागरिकांना व्हिसाशिवाय प्रवास करता येणार आहे. पासपोर्ट मजबूत झाल्यानंतर अधिक देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळू शकतो.
हेनली पासपोर्ट इंडेस्क अनुसार, भारतीय पासपोर्टसह प्रवासी आता 59 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करता येईल. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्टच्या डेटावर ही इंडेक्स आधारित आहे. त्यानुसार या यादीत भारताचे स्थान 84 वर पोहोचले आहे. 2021 च्या चौथ्या तिमाहीत 58 व्हिसामुक्त पोहोचणाऱ्या देशांच्या तुलनेत ओमान हा नवीन देश आहे. येथे भारतीय पासपोर्टधारक प्रवासी व्हिसाशिवाय प्रवेश करू शकतात.
इंडेक्सचे टॉप पासपोर्ट
जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, जर्मनी, स्पेन, लक्समबर्ग, इटली, फिनलँड, फ्रान्स, स्वीडन, नेदरलँड, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, पोर्तुगाल आणि आयर्लँडला हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये सर्वात वरचे स्थान मिळाले आहे. जपान आणि सिंगापूर या रँकींगवर टॉप आहेत. या दोन्ही देशातील पासपोर्टधारक आता जगभरातील 192 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश करता येऊ शकतो. अफगाणिस्तानपेक्षा 166 ने ही संख्या जास्त आहे. अफगाणिस्तान हा या इंडेक्समध्ये सर्वात खालच्या स्थानावर आहे.