संयुक्त राष्ट्रे : ब्रॉडबँडचा विस्तार करण्याच्या बाबतीत भारताची रँकिंग घसरली आहे; तथापि इंटरनेटचा वापर करण्याच्या टक्केवारीचा विचार करता थोडी प्रगती झाल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्र ब्रॉडबँड आयोगाने सतत विकासाच्या उद्दिष्टांवर होणाऱ्या शिखर परिषदेपूर्वी, त्याचबरोबर २६ सप्टेंबर रोजी ब्रॉडबँड आयोगाच्या बैठकीपूर्वी हा अहवाल जारी करण्यात आला आहे.२०१४ मध्ये इंटरनेटच्या व्यक्तिगत उपयोगाचा विचार करता भारत १३६ व्या स्थानावर राहिला. येथे १८ टक्के लोक इंटरनेटचा उपयोग करीत होते. वर्षभरापूर्वी, २०१३ मध्ये या प्रकरणात भारत १४२ व्या स्थानावर होता. त्यावेळी १५.१ टक्के लोक इंटरनेटचा वापर करीत होते. इंटरनेटचा वापर करणाऱ्या कुटुंबाचा विचार करता भारत १३३ विकसनशील देशांत ८० व्या स्थानावर आहे.
ब्रॉडबँड विस्तारात भारताची रँकिंग घसरली
ब्रॉडबँडचा विस्तार करण्याच्या बाबतीत भारताची रँकिंग घसरली आहे; तथापि इंटरनेटचा वापर करण्याच्या टक्केवारीचा विचार करता थोडी प्रगती झाल्याचे
By admin | Published: September 22, 2015 10:01 PM2015-09-22T22:01:26+5:302015-09-22T22:01:26+5:30