Lokmat Money > बिझनेस न्यूज > डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचे चोख प्रत्युत्तर, अमेरिकेतून येणाऱ्या मालावरील आयात शुल्क वाढवले

डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचे चोख प्रत्युत्तर, अमेरिकेतून येणाऱ्या मालावरील आयात शुल्क वाढवले

भारतातून येणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनिअमच्या वस्तूंवर आयात शुक्ल वाढवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 03:40 PM2018-06-21T15:40:25+5:302018-06-21T15:40:25+5:30

भारतातून येणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनिअमच्या वस्तूंवर आयात शुक्ल वाढवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे.

India's reply to Donald Trump, raising import duty on goods coming from the United States | डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचे चोख प्रत्युत्तर, अमेरिकेतून येणाऱ्या मालावरील आयात शुल्क वाढवले

डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचे चोख प्रत्युत्तर, अमेरिकेतून येणाऱ्या मालावरील आयात शुल्क वाढवले

नवी दिल्ली -  भारतातून येणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनिअमच्या वस्तूंवर आयात शुक्ल वाढवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने अमेरिकेतून येणाऱ्या विविध उत्पन्नांवरील सीमा शुल्क वाढवले आहे. या उत्पादनमांमध्ये बंगाली चणा, मसूर डाळ आणि आर्टेमिया यांचा समावेश आहे. नवीन शुल्क दर हे 4 ऑगस्टपासून लागू होतील, असे वित्त मंत्रालयाने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे. 

वित्तमंत्रालयाने अमेरिकेतून येणाऱ्या मटार आणि बंगाली चण्यावरील शुल्क वाढवून 60 टक्के केले आहे. तसेच मसूर डाळीवरील शुल्क वाढवून 30 टक्के करण्यात आले आहे. याशिवाय बोरिक अॅसिडवर 7.5 टक्के आणि घरगुती रिजेंटवर 10 टक्के शुल्क लावण्यात आले आहे. आर्टेमियावरील आयात शुल्कही 15 टक्के करण्यात आले आहे. याशिवाय ठरावीक प्रकारचे नट, लोह आणि स्टीलची उत्पादने, सफरचंद, नाशपाती,. स्टेनलेस स्टीलची उत्पादने ट्यूब-पाइप फिटिंग, स्क्रू, बोल्ट आणि रिवेटवरील शुल्क वाढवण्यात आले आहे. मात्र अमेरिकेतून आयात होणाऱ्या दुचाकींवरील शुक्ल वाढवण्यात आलेले नाही. 

अमेरिकेने ठरावीक स्टील आणि अॅल्युमिनीअमच्या उत्पादनांवरील आयात शुल्क वाढवले होते. त्यामुळे भारतावर 24.1 कोटी डॉलर (सुमारे 1650 कोटी) एवढा बोजा पडणार आहे. त्यामुळे अमेरिकेच्या धोरणांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने हे पाऊल उचलले आहे.  

Web Title: India's reply to Donald Trump, raising import duty on goods coming from the United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.