Join us

भारताच्या सेवा क्षेत्रात आॅगस्टमध्ये झाली घसरण; नवी मागणी घटल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 3:43 AM

जुलैमध्ये २१ महिन्यांच्या उच्चांकावर गेलेले भारतीय सेवा क्षेत्र आॅगस्टमध्ये घसरले आहे. नव्या मागणीअभावी ही घसरण झाली आहे. निक्केई इंडिया सर्व्हिसेस बिझनेस अ‍ॅक्टिव्हिटी इंडेक्स आॅगस्टमध्ये घसरून ५१.५ अंकांवर आला आहे.

नवी दिल्ली : जुलैमध्ये २१ महिन्यांच्या उच्चांकावर गेलेले भारतीय सेवा क्षेत्र आॅगस्टमध्ये घसरले आहे. नव्या मागणीअभावी ही घसरण झाली आहे. निक्केई इंडिया सर्व्हिसेस बिझनेस अ‍ॅक्टिव्हिटी इंडेक्स आॅगस्टमध्ये घसरून ५१.५ अंकांवर आला आहे. जुलैमध्ये तो ५४.२ अंकांवर होता. ही सेवा क्षेत्राची तीन महिन्यांतील सर्वाधिक कमजोर वाढ ठरली आहे. पीएमआय मापदंडात निर्देशांक ५० अंकांच्या वर असल्यास वाढ दर्शवितो. ५० अंकांच्या खालील निर्देशांक घसरण दर्शवितो.आयएचएस मार्किटच्या अर्थतज्ज्ञ तथा अहवालाच्या लेखिका आश्ना दोधिया यांनी सांगितले की, जुलैमध्ये शिखरावर असलेले भारताचे सेवा क्षेत्र आॅगस्टमध्ये कमजोर झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. नवीन व्यवसाय आणि रोजगार यात अनुक्रमे मे आणि नोव्हेंबर, २०१७ मध्ये असलेल्या मंद विस्ताराशी हे आकडे जुळतात.दरम्यान, निक्केई इंडिया कंपोझिट पीएमआय आउटपूट इंडेक्सही घसरून ५१.९ अंकांवर आला आहे. जुलैमध्ये तो २१ महिन्यांच्या उच्चांकावर ५४.१ अंकांवर होता. वस्तू उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील कमजोर वृद्धीमुळे निर्देशांक घसरला आहे. आॅगस्टमध्ये इनपुटचा खर्च नऊ महिन्यांच्या उच्चांकावर राहिला आहे. व्यवसायिक आत्मविश्वास मेनंतर सर्वोच्च पातळीवर गेला आहे. एवढीच एक सकारात्मक बाब या महिन्यात राहिली.दोधिया यांनी सांगितले की, सेवा क्षेत्रातील इनपुट खर्च नोव्हेंबर, २०१७ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर गेली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे हा फटका बसला आहे. इनपुटमधील वाढीव खर्चाचा सर्व बोजा ग्राहकांच्या माथी मारणे संस्थांना शक्य नाही. कारण किमतीच्या बाबतीत ग्राहक संवेदनक्षम आहेत. याचा परिणाम म्हणून या क्षेत्रातील संस्थांच्या नफ्यात घट झाली आहे.हेही घटक कारणीभूतइनपूट खर्च वाढण्यास इतरही अनेक घटक कारणीभूत आहेत. आॅगस्टच्या धोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात २५ आधार अंकांची वाढ केली होती. रेपोदर आता ६.५ टक्के झाल्यामुळे बँकांना मिळणारी अल्प मुदतीची कर्जे महागली आहेत. महागाई वाढण्यास हेही एक कारण आहे.निक्केई इंडिया सर्व्हिसेस बिझनेस अ‍ॅक्टिव्हिटी इंडेक्सआॅगस्टमध्ये घसरून51.5अंकांवर आला आहे. जुलैमध्ये तो54.2अंकांवर होता.

टॅग्स :भारत