Join us

भारताचा जगात डंका! ब्रिटन, फ्रान्स, रशियाला मागे टाकले, ३.७५ ट्रिलियन डॉलरची झाली GDP

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 1:18 PM

देशाच्या GDP मध्ये २०२३ मध्येही मोठी वाढ झाली आहे. भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेने २०२३ मध्ये मोठा विक्रम केला आहे. देशाच्या GDP ने ३.७५ ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचली आहे. या संदर्भात केंद्रीय अर्थ खात्याने ट्विट करुन माहिती दिली. २०१४ नंतर पहिल्यांदाच भारताचा जीडीपी दोन ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त वाढून २०२३ मध्ये ३.७५ ट्रिलियन डॉलरवर पोहोचली. भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, असंही ट्विटमध्ये सांगितलं आहे.

HDFC Bank : HDFC बँक विशेष FD वर बंपर व्याज देणार, ५५ महिन्यांच्या गुंतवणुकीवर मजबूत परतावा

 सध्याच्या किंमतीनुसार भारताचा जीडीपी ३,७३७ अब्ज डॉलर आहे. विकसित देशांशी तुलना केल्यास, भारताचा जीडीपी अमेरिका ( २६,८५४ अरब डॉलर), चीन (१९,३७४ अरब डॉलर), जपान (४,४१० अरब डॉलर) आणि जर्मनी (४,३०९ अरब डॉलर) च्या जीडीपीपेक्षा कमी आहे.

सध्याच्या किंमतीनुसार भारताचा जीडीपी ब्रिटन ३,१५९ अरब डॉलर, फ्रान्स २,९२४ अरब डॉलर, कॅनडा २,०८९ अरब डॉलर, रशिया १,८४० अरब डॉलर आणि ऑस्ट्रलिया १,५५० अरब डॉलर पेक्षा जास्त आहे. अर्थ मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, भारताचा जीडीपी २०२३ मध्ये ३.७५ ट्रिलियनवर पोहोचला आहे, जो २०१४ मध्ये सुमारे २ ट्रिलियन डॉलर होती. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर चमकणारी मानली जाते.  

भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज दरम्यान, रेटिंग एजन्सी मूडीजने रविवारी जूनच्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था ६ टक्के ते ६.३ टक्के दराने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, भारतीय अर्थव्यवस्था गेल्या आठवड्यात रिझव्‍‌र्ह बँकेने वर्तवलेल्या ८ टक्के विकास दरापेक्षा खूपच कमी असल्याचा मूडीजचा अंदाज आहे. मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसचे असोसिएट मॅनेजिंग डायरेक्टर जीन फॅंग ​​यांनी मुलाखतीत सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचा विकास दर ६-६.३ टक्क्यांच्या आसपास राहण्याची आम्हाला अपेक्षा आहे. जीडीपीचे आकडे देशाचे चित्र दर्शवतात जीडीपीचे आकडे कोणत्याही देशासाठी अतिशय महत्त्वाचे डेटा असतात. वास्तविक, ते देशाच्या अर्थव्यवस्थेचे संपूर्ण चित्र दाखवतात. GDP चे दोन प्रकार आहेत, पहिला वास्तविक GDP आणि Nonimal GDP. वास्तविक GDP मधील वस्तू आणि सेवांच्या मूल्याची गणना बेस वर्षाच्या मूल्यावर किंवा स्थिर किंमतीवर केली जाते. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) द्वारे GDP आकडे जारी केले जातात.

टॅग्स :भारतनिर्मला सीतारामन