नवी दिल्ली : आशियासह पश्चिमेकडील माेठ्या शेअर बाजारांमध्ये वर्ष २०२२ मध्ये माेठी पडझड झाली. मात्र, भारताच्या शेअर बाजाराने प्रतिकूल परिस्थितीतही दमदार कामगिरी केली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी यंदा जगातील सर्वाेत्तम पाच शेअर बाजारांमध्ये दुसऱ्या स्थानी आहेत. पहिल्या क्रमांकावर ब्राझीलच्या ‘आयबाेवेस्पा’ असून ताे ४.७ टक्क्यांनी वाढले.
अशी राहिली शेअर बाजारांची कामगिरी (टक्के)ब्राझील आयबाेवेस्पा ४.७भारत सेन्सेक्स ४.४भारत निफ्टी ४.३ब्रिटन एफटीएसई १.५१अमेरिका डाउ जाेन्स -८.५८जपान निक्केई -९.३७जर्मनी डीएएक्स -११.९२हाॅक काॅंग हॅंग सेंग -१५.४६अमेरिका नॅसडॅक -३३.०३