Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारताची चहाची निर्यात ३६ वर्षांच्या उच्चांकावर

भारताची चहाची निर्यात ३६ वर्षांच्या उच्चांकावर

२0१७ मध्ये भारतातून तब्बल २४0.७ दशलक्ष किलो चहाची निर्यात झाली असून, हा ३६ वर्षांचा उच्चांक ठरला आहे. या आधी १९८१ मध्ये भारतातून २४१.२५ दशलक्ष किलो चहाची निर्यात झाली होती.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:10 AM2018-02-08T00:10:25+5:302018-02-08T00:11:29+5:30

२0१७ मध्ये भारतातून तब्बल २४0.७ दशलक्ष किलो चहाची निर्यात झाली असून, हा ३६ वर्षांचा उच्चांक ठरला आहे. या आधी १९८१ मध्ये भारतातून २४१.२५ दशलक्ष किलो चहाची निर्यात झाली होती.

India's tea exports exceeded the 36-year high | भारताची चहाची निर्यात ३६ वर्षांच्या उच्चांकावर

भारताची चहाची निर्यात ३६ वर्षांच्या उच्चांकावर

कोलकाता : २0१७ मध्ये भारतातून तब्बल २४0.७ दशलक्ष किलो चहाची निर्यात झाली असून, हा ३६ वर्षांचा उच्चांक ठरला आहे. या आधी १९८१ मध्ये भारतातून २४१.२५ दशलक्ष किलो चहाची निर्यात झाली होती.
भारतीय चहा बोर्डाच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. बोर्डाने म्हटले की, २0१६च्या तुलनेत २0१७ मध्ये तब्बल १८.२३ दशलक्ष किलो अधिक चहा निर्यात झाला. ही वाढ ८.२0 टक्के आहे. निर्यात झालेल्या चहाची किंमत ४,७३१.६६ कोटी रुपये आहे. आदल्या वर्षाच्या तुलनेत हा आकडा ५.९0 टक्के अधिक आहे. २0१७ मध्ये उत्तर भारतातील चहा निर्यात १४८.४१ दशलक्ष किलो राहिली. त्याचप्रमाणे, दक्षिण भारतातील चहाची निर्यात ९२.२७ दशलक्ष किलो राहिली. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातून ज्या देशांत मोठ्या प्रमाणात चहाची निर्यात झाला, त्यात इजिप्त (६.१६ दशलक्ष किलो अधिक), इराण (४.१५ दशलक्ष किलो अधिक), चीन (२.८0 दशलक्ष किलो अधिक), यूएई व श्रीलंका यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
>७२६ कोटींचा चहा
डॉलरच्या हिशेबाने २0१७ मध्ये आदल्या वर्षाच्या तुलनेत ९.२६ टक्के वाढ झाली. ७२६.७६ डॉलरचा चहा या वर्षात निर्यात झाला, असेही बोर्डाने म्हटले आहे. २0१७ मध्ये 18.23 दशलक्ष किलो अधिक चहा निर्यात झाला.

Web Title: India's tea exports exceeded the 36-year high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.