Join us  

भारताची UPI सिस्टीम जगाला 'कॅशलेस' करणार! मोठी तयारी सुरू, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 4:59 PM

२०१६ मध्ये कॅशलेस व्यवहार वाढवण्यासाठी देशात UPI लाँच झाले. आता याला ७ वर्षे पूर्ण झाली आहेत.

२०१६ मध्ये देशात डिजिटल पद्धतीने व्यवहारास मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी तेव्हा UPI लाँच केले.  याद्वारे आपल्याला व्यवहार करणे सोपे झाले, आपल्या युपीआयच्या भुरळ आता जगालाही पडली आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये नवी दिल्लीत झालेल्या G-20 देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेत पाहायला मिळाली. तिथे UPI च्या माध्यमातून डिजिटल व्यवहारांच्या क्षेत्रात भारताची कामगिरी पाहून अनेक देशांनी कौतुक केले आहे.  अमेरिका, जपान, ब्रिटन किंवा फ्रान्स प्रत्येक देशाला UPI चा अवलंब करून डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन द्यायचे आहे.

भारताची अर्थव्यवस्था सूसाट; UAE करणार 50 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, चीनला लागणार मिर्ची...

श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी २ नोव्हेंबर २०२३ रोजी एका कार्यक्रमात घोषणा केली की, युनिफाइड पेमेंट इंटरफेस लवकरच श्रीलंकेत सुरू होईल. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे सीईओ आशिष चौहान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले, '२०२२-२३ या आर्थिक वर्षात १.७ ट्रिलियन डॉलरचे व्यवहार झाले आहेत. भारताच्या UPI ला संपूर्ण जगाने पसंती दिली आहे. जपान, सिंगापूर, यूएई, फ्रान्स, यूके आणि जपान यांना त्यांच्या देशांमध्ये यूपीआयचा अवलंब करायचा आहे. हे आर्थिक वर्ष मार्च २०२४ मध्ये संपेल, तेव्हा पुढील ६ महिन्यांत UPI व्यवहारांमध्ये आणखी वाढ होईल. या वर्षी UPI व्यवहार एक नवा रेकॉर्ड बनवणार आहे.

भारताला भेट देणाऱ्या राजनयिकांना UPI आवडत आहे. काही दिवसापूर्वी जर्मन दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक फोटो शेअर केली होती. यात जर्मनीचे फेडरल डिजिटल आणि वाहतूक मंत्री वोल्कर विसिंग हे भाजीच्या दुकानात खरेदी करताना दिसले आणि त्यांनी UPI द्वारे डिजिटल पद्धतीने पेमेंट देखील केले.

UPI ही सर्वात यशस्वी डिजिटल पेमेंट प्रणाली आहे. सात वर्षांपूर्वी एप्रिल २०१६ मध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेस लाँच केला होता. UPI ही एक झटपट पेमेंट प्रणाली आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती मोबाईल फोनद्वारे इतर कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यापाऱ्याला त्वरित डिजिटल पेमेंट करू शकते. UPI ने भारतातील डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चरचे जग बदलले. डिजिटल पेमेंटच्या बाबतीत, भारताने UPI च्या माध्यमातून जी प्रसिद्धी मिळवली आहे. देशातील कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, NPCI, भारतीय रिझर्व्ह बँक आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांनी एकत्रितपणे UPI सुरू केले.

 

 

टॅग्स :बँकडिजिटलगुगल पे