नवी दिल्ली : युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) भारतातच नव्हे, तर विदेशात डंका वाजवू लागले आहे. सिंगापूर, फान्समध्ये यूपीआय याआधीच सुरू झालेले असून, आता न्यूझिलंडमध्येही त्याचा प्रवेश होईल.
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने म्हटले की, भारत-न्यूझिलंड या देशांत व्यवसाय व पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी यूपीआयचा वापर करण्याचा विचार सुरू आहे. वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि न्यूझिलंडचे व्यापार व निर्यात विकासमंत्री डेमियन ओकॉनर यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत यूपीआयबाबत चर्चा झाली. यावर लवकरच अंतिम निर्णय होऊ शकतो.
भारताचे यूपीआय आता न्यूझिलंडमध्येही पोहोचणार, लवकरच अंतिम निर्णय
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने म्हटले की, भारत-न्यूझिलंड या देशांत व्यवसाय व पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी यूपीआयचा वापर करण्याचा विचार सुरू आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 01:59 AM2023-08-31T01:59:51+5:302023-08-31T06:14:27+5:30