नवी दिल्ली : युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) भारतातच नव्हे, तर विदेशात डंका वाजवू लागले आहे. सिंगापूर, फान्समध्ये यूपीआय याआधीच सुरू झालेले असून, आता न्यूझिलंडमध्येही त्याचा प्रवेश होईल. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने म्हटले की, भारत-न्यूझिलंड या देशांत व्यवसाय व पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी यूपीआयचा वापर करण्याचा विचार सुरू आहे. वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि न्यूझिलंडचे व्यापार व निर्यात विकासमंत्री डेमियन ओकॉनर यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत यूपीआयबाबत चर्चा झाली. यावर लवकरच अंतिम निर्णय होऊ शकतो.
भारताचे यूपीआय आता न्यूझिलंडमध्येही पोहोचणार, लवकरच अंतिम निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 1:59 AM