नवी दिल्ली : देशात चालू आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांत (एप्रिल ते जुलै) युरियाची आयात २९ टक्के वाढून २१.४३ लाख टनांवर गेली. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत ही आयात १६.६५ लाख टन होती.युरियाचे देशातील उत्पादन व मागणी विचारात घेऊन ही आयात केली जाते. देशाची वार्षिक गरज ३०० लाख टन असून देशातील उत्पादन २२० टन आहे.
भारताची युरिया आयात वाढली २९ टक्क्यांनी
By admin | Published: August 19, 2015 10:34 PM