Lokmat Money > बिझनेस न्यूज > आर्थिक मंदीचा भारताला बसला सर्वाधिक फटका; ९0% देशांत विपरित परिणाम

आर्थिक मंदीचा भारताला बसला सर्वाधिक फटका; ९0% देशांत विपरित परिणाम

'येत्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँक यांची संयुक्त बैठक आहे.'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 05:01 AM2019-10-10T05:01:58+5:302019-10-10T05:05:01+5:30

'येत्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँक यांची संयुक्त बैठक आहे.'

India's worst hit due to economic recession; Contrary results in 0% of countries | आर्थिक मंदीचा भारताला बसला सर्वाधिक फटका; ९0% देशांत विपरित परिणाम

आर्थिक मंदीचा भारताला बसला सर्वाधिक फटका; ९0% देशांत विपरित परिणाम

नवी दिल्ली : सध्या संपूर्ण जगा आर्थिक संकटांचा सामना करीत असून, या आर्थिक मरगळीमुळे जगातील ९0 टक्के देशांच्या विकास दरावर विपरित परिणाम झाला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग अधिक असल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम भारतावर झाला आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी म्हटले आहे.
क्रिस्टालिना जॉर्जिएवा म्हणाल्या की, सध्याची स्थिती पाहता जगातील ९0 टक्के देशांच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग या वर्षात कमीच असेल. पुढील वर्षातही सर्व देशांच्या अर्थव्यवस्थांपुढील संकट कायम राहील, असे दिसत आहे. आर्थिक मंदीच्या सावटाखाली असलेल्या भारताला याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील, अशी शक्यता आहे. ब्राझिललाही याचे मोठे परिणाम सहन करावे
लागणार आहेत.
अमेरिका व चीन यांच्यात सुरू असलेल्या व्यापारी युद्धाचा ओझरता उल्लेख करून क्रिस्तालिना जॉर्जिएवा म्हणाल्या की, अशा व्यापार युद्धातून कोणाचाही फायदा होणार नाही. झालेच तर नुकसानच होईल. बल्गेरियातील अर्थतज्ज्ञ असलेल्या क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी अलीकडेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून सूत्रे स्वीकारली आहेत.

महत्त्वाची संयुक्त बैठक
क्रिस्टालिना जॉर्जिएवा म्हणाल्या की, येत्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँक यांची संयुक्त बैठक आहे. त्यात आम्ही संयुक्तपणे जागतिक अर्थव्यवस्थेविषयीचे आपले अंदाज मांडू. त्यात या दशकातील सर्वात मोठा मंदीचा हा काळ असल्याचे मत व्यक्त होईल, अशी शक्यता आहे. या बैठकीला काही महत्त्वाच्या देशांचे अर्थमंत्री व जगभराती प्रमुख बँकांचे प्रमुख आणि उपस्थित राहणार आहेत.

Web Title: India's worst hit due to economic recession; Contrary results in 0% of countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.