Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिकेतील कर्मचारी कपातीमुळे भारतातील तरुणांना मिळणार नोकऱ्या 

अमेरिकेतील कर्मचारी कपातीमुळे भारतातील तरुणांना मिळणार नोकऱ्या 

बंगा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, आपली कंपनी भारतात प्रतिभाशाली कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहे. दरवर्षी कर्मचारी संख्येत २५ ते ३५ टक्के वाढ करण्याची कंपनीची योजना आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 09:12 AM2023-03-21T09:12:33+5:302023-03-21T09:13:07+5:30

बंगा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, आपली कंपनी भारतात प्रतिभाशाली कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहे. दरवर्षी कर्मचारी संख्येत २५ ते ३५ टक्के वाढ करण्याची कंपनीची योजना आहे.

India's youth will get jobs due to job cuts in America | अमेरिकेतील कर्मचारी कपातीमुळे भारतातील तरुणांना मिळणार नोकऱ्या 

अमेरिकेतील कर्मचारी कपातीमुळे भारतातील तरुणांना मिळणार नोकऱ्या 

नवी दिल्ली : अमेरिकेतील बड्या कंपन्यांत सुरू असलेल्या कर्मचारी कपातीमुळे भारतात मोठ्या प्रमाणात काम वाढेल तसेच माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रास मंदीतही महत्त्वपूर्ण लाभ मिळेल, असे प्रतिपादन ‘ग्लोबललॉजिक’चे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नीतेश बंगा यांनी केले आहे.

बंगा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, आपली कंपनी भारतात प्रतिभाशाली कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहे. दरवर्षी कर्मचारी संख्येत २५ ते ३५ टक्के वाढ करण्याची कंपनीची योजना आहे. आम्ही एका महिन्यात सुमारे १ हजार लोकांची भरती करतो. त्यातील सुमारे ५० टक्के कर्मचारी भारतात नियुक्त होत असतात. 

असा मिळेल लाभ
अमेरिकेत कर्मचारी कपात मोठ्या प्रमाणात सुरू असली तरी भारतास आणखी नरमाईचा सामना करावा लागणार नाही. गुगल, ट्विटर अथवा फेसबुक यांसारख्या कंपन्या अमेरिकेत कर्मचारी कपात करतात, तरीही त्यांचे काम थांबत नाही. हेच काम भारतात पोहोचेल. या कंपन्यांना कमी खर्चात काम करून हवे आहे. 

Web Title: India's youth will get jobs due to job cuts in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी