- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया सुरू असतानाच, तोट्यातील ही कंपनी विकली न गेल्यास ती बंद करावी लागेल, असे स्पष्ट संकेत नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी बुधवारी दिले.
ते म्हणाले, ही तोट्यातील कंपनी आणखी चालवणे अशक्य आहे. आतापर्यंत आर्थिक पॅकेज देऊनच कंपनी सुरू ठेवली आहे. सूत्रांनी सांगितले की, विमान वाहतूक क्षेत्रात स्पर्धा वाढल्याने सरकारची स्वत:ची विमान कंपनी असणे गरजेचे आहे, असे सरकारमधील एका गटाचे मत आहे. आता मात्र विमान वाहतूक सेवेतून पूर्णत: बाहेर पडण्याचा सरकारचा विचार दिसत असल्याचे दिसत आहे. एअर इंडिया वेळेवर पगार देत नसल्याने अनेक वैमानिक राजीनामे देत असल्याच्या वृत्ताचा मंत्रिमहोदयांनी नकार दिला.
विक्री न झाल्यास एअर इंडिया बंद करण्याचे संकेत
एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया सुरू आहे...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 04:03 AM2019-11-28T04:03:48+5:302019-11-28T04:04:33+5:30