नवी दिल्ली - भारत २०२५ च्या अखेरपर्यंत युरियाची आयात पूर्णत: बंद करेल, असे रसायने व खतेमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले.
मांडविया यांनी सांगितले की, युरियाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार अनेक पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. नॅनो लिक्विड युरिया आणि नॅनो लिक्विड डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) यांसारखी पर्यायी खते उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बंद पडलेले ४ युरिया निर्मिती प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. ५ वा प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
देशाची वार्षिक युरिया मागणी सुमारे ३५० लाख टन आहे. देशांतर्गत युरिया उत्पादनाची स्थापित क्षमता २२५ लाख टनांवरून वाढून ३१० लाख टन झाली आहे. सध्या मागणी व उत्पादनातील अंतर ४० लाख टन आहे.
शेतकऱ्यांसाठी स्वदेशी खत
Fertilizers : भारत २०२५ च्या अखेरपर्यंत युरियाची आयात पूर्णत: बंद करेल, असे रसायने व खतेमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 05:56 AM2024-04-06T05:56:52+5:302024-04-06T05:57:17+5:30