Join us

शेतकऱ्यांसाठी स्वदेशी खत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 5:56 AM

Fertilizers : भारत २०२५ च्या अखेरपर्यंत युरियाची आयात पूर्णत: बंद करेल, असे रसायने व खतेमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले.

 नवी दिल्ली - भारत २०२५ च्या अखेरपर्यंत युरियाची आयात पूर्णत: बंद करेल, असे रसायने व खतेमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले.मांडविया यांनी सांगितले की, युरियाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार अनेक पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. नॅनो लिक्विड युरिया आणि नॅनो लिक्विड डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) यांसारखी पर्यायी खते उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बंद पडलेले ४ युरिया निर्मिती प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. ५ वा प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.देशाची वार्षिक युरिया मागणी सुमारे ३५० लाख टन आहे. देशांतर्गत युरिया उत्पादनाची स्थापित क्षमता २२५ लाख टनांवरून वाढून ३१० लाख टन झाली आहे. सध्या मागणी व उत्पादनातील अंतर ४० लाख टन आहे.

टॅग्स :केंद्र सरकारभारतशेती क्षेत्र