काही दिवसातच 2022 हे वर्ष संपणार आहे, सध्याचे दिवस हे सुट्टीचे आहेत. अनेकजण सुट्टी एन्जॉय करण्यासाठी बाहेरच्या देशात जाण्याचे नियोजन करतात. आता इंडिगोने एक ऑफर सुरू केली आहे. ही ऑफर फक्त तीन दिवसांसाठी आहे. ही ऑफर 23 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2022 या दरम्यान असणार आहे.
इंडिगो एअरलान्सने देशांतर्गत प्रवासासाठी 2023 रुपये आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 4,999 रुपयांपासून तिकीट सुरू होणार आहेत.
इंडिगो एअसलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, ही ऑफर 15 जानेवारी ते 14 एप्रिल 2023 पर्यंत प्रवासासाठी तिकीट बुक करु शकतात. या योजनेचा मुळ उद्देश हा विमान प्रवास क्षेत्रास सुधार करण्याचा आहे. आता आपण 2023 मध्ये प्रवेश करत आहे, अनेकजण विमान प्रवास करत आहेत. त्यामुळे आम्ही हवाई सेक्टमध्ये अशी योजना आणत आहोत, असं इंडिगोने म्हटले आहे.
Jio New Year Offer ऑफरची घोषणा, लाँच केला खास प्लॅन; मिळणार 630GB 5G डेटा
इंडिगो 290 विमानांच्या ताफ्यासह, दररोज 1,600 पेक्षा जास्त उड्डाणे चालवत असल्याचा दावा करत आहे. इंडिगो 76 देशांतर्गत आणि 26 आंतरराष्ट्रीय उड्डाणे घेते. ही ऑफर अंतर्गत मर्यादित यादी उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना सवलत उपलब्धतेच्या अधीन राहून दिली जाईल. शिवाय, ही ऑफर इंडिगोच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्कवरील विविध क्षेत्रांवरील नॉन-स्टॉप फ्लाइट्सवरच वैध आहे. याव्यतिरिक्त, ग्राहक इंडिगोच्या भागीदार बँक HSBC कडून कॅशबॅक देखील घेऊ शकतात.
ही ऑफर इतर कोणत्याही ऑफर, योजना किंवा जाहिरातीसोबत जोडली जाऊ शकत नाही. तसेच, ही ऑफर इंडिगोच्या ग्रुप बुकिंगवर वैध नाही. ही ऑफर नॉन-हस्तांतरणीय, नॉन-एक्सचेंज करण्यायोग्य आणि नॉन-एनकॅश करण्यायोग्य आहे, असंही कंपनीने म्हटले आहे. ऑक्टोबरमध्ये इंडियन एअरलाइन्सने 1.14 कोटी प्रवाशांनी प्रवास केला. सप्टेंबरमधील विमान प्रवाशांच्या तुलनेत ही संख्या 10 टक्के अधिक आहे.