नवी दिल्ली : कुठल्यातरी महत्त्वाच्या कामासाठी किंवा फिरायला जायचं असेल तर प्रवास आलाच. मग, प्रवासादरम्यान सामान किती घेऊन जायचे?, पोर्टरचा वेगळा खर्च, घरातून विमानतळावर सामान आणून मग बोर्डिंग करून कन्व्हेयर बेल्टवर थांबणं. या सगळ्या तणावातून बाहेर पडण्यासाठी इंडिगोने (Indigo)खास सेवा सुरू केली आहे.
या सेवेअंतर्गत तुमचे सामान विमानतळापासून घरापर्यंत पोहोचवले जाणार आहे. इंडिगोने म्हटले आहे की, डोअर-टू-डोअर बॅगेज ट्रान्सफर सर्व्हिस सुरू करण्यात आली आहे. जिथून प्रवास सुरू होत आहे, तिथून सामान सुरक्षितपणे उचलले जाईल आणि तुमच्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचवले जाईल.
कोणत्या शहरांसाठी मिळेल ही सुविधा?इंडिगोची ही विशेष सेवा सध्या बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद आणि मुंबईसाठी सुरू करण्यात आली आहे. इंडिगोने म्हटले आहे की, ग्राहकांचे सामान कार्यक्षमतेने आणि सुरक्षितपणे उचलले जाते आणि गंतव्य स्थानापर्यंत पोहोचवले जाते.
किती रुपये द्यावे लागतील?या सुविधेसाठी प्रवाशांना केवळ 325 रुपये मोजावे लागणार आहेत. या सेवेचे नाव 6 ईबॅगपोर्ट (6EBagport) आहे, ज्याद्वारे ग्राहक फ्लाइट टेक ऑफ होण्याच्या 24 तास आधी बॅगेज ट्रान्सफर सर्व्हिसचा लाभ घेऊ शकतात. या बॅगेज ट्रान्सफर सर्व्हिससाठी कंपनी कार्टरपोर्टरसोबत (CarterPorter) भागीदारी करणार आहे.
इंडिगोच्या अनेक हवाई मार्गांवर डायरेक्ट फ्लाइट >> इंडिगो 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरपासून दिल्ली -पाटणा, पाटणा -दिल्ली, पाटणा- मुंबई आणि पाटणा -हैदराबाद, बंगळुरू- पाटणा हवाई मार्गांवर नवीन डायरेक्ट फ्लाइट सुरू करणार आहे.>> इंडिगो 2 नोव्हेंबरपासून ओडिशातील भुवनेश्वर ते राजस्थानमधील जयपूरला जोडणारीडायरेक्ट फ्लाइट सुरू करणार आहे.>> कानपूर आणि दिल्ली दरम्यान 31 ऑक्टोबर 2021 पासून डायरेक्ट फ्लाइट सेवा सुरू होणार आहे, तर 1 नोव्हेंबर 2021 पासून कानपूर - हैदराबाद, कानपूर-बंगळुरू आणि कानपूर- मुंबई दरम्यान डायरेक्ट फ्लाइट सर्व्हिस सुरू होणार आहे.