IndiGo Flight Engine Shutdown: तुम्ही अनेकदा विमानांमध्ये बिघाड झाल्याच्या घटना पाहिल्या असतील. मंगळवारी अशाच दोन घटना घडल्या. मदुराईहून मुंबईला येणाऱ्या Indigoच्या विमानाचे हवेतच इंजिन बंद पडले. सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही अन् विमान मुंबई विमानतळावर सुखरूप उतरले.
सविस्तर माहिती अशी की, मदुराईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट 6E-2012 मध्ये मुंबईत उतरण्यापूर्वी तांत्रिक बिघाड झाला. विमानाचे एक इंजिन अचानक बंद पडले. यानंतर पायलटने दोन इंजिन असलेले एअरबस A321 विमान एका इंजिनच्या जोरावर सुरक्षितपणे लँड केले. हे विमान सध्या मुंबईत ठेवण्यात आले असून सर्व आवश्यक तपासणीनंतर ते पुन्हा कार्यान्वित केले जाईल.
IndiGo reports two engine shutdown incidents mid-air, both aircraft land safely
— ANI Digital (@ani_digital) August 29, 2023
Read @ANI Story | https://t.co/D7yrak3vpX#Indigo#EngineShutdown#flightspic.twitter.com/DrqwyHkrWP
विशेष म्हणजे, एकाच दिवशी इंडिगोच्या दोन विमानांमध्ये अशाप्रकारची घटना घडली. बंगळुरुला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानातही अशीच घटना पाहायला मिळाली. कोलकाता ते बंगळुरू इंडिगोच्या विमानाचेही इंजिन बंद पडले. सुदैवाने हे विमानदेखील सुखरुप लँड करण्यात आले. या विमानाचीही तपासणी केली जाणार आहे.