Join us  

Indigo ची शानदार ऑफर, फक्त 915 रुपयांत विमान प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 5:45 PM

indigo special offer on 15th anniversary sale : या ऑफरचा लाभ आजपासून म्हणजेच 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्टपर्यंत घेऊ शकता.

नवी दिल्ली : जर तुम्ही कुठेतरी विमान प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही स्वस्तात विमान प्रवास (Cheap air ticket) करू शकता. 15 व्या वर्धापन दिनानिमित्त (15th anniversary sale) इंडिगो (Indigo) एक विशेष ऑफर घेऊन आली आहे. तुम्ही या ऑफरचा लाभ आजपासून म्हणजेच 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट पर्यंत घेऊ शकता. दरम्यान, कंपनीला 15 वर्षे पूर्ण  झाली आहेत. या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी हा खास सेल आणला आहे. (indigo special offer on 15th anniversary sale only in 915 rupees)

इंडिगोने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, या ऑफर अंतर्गत तुम्ही फक्त 915 रुपयांमध्ये विमान प्रवास करू शकता. 1 सप्टेंबर 2021 ते 26 मार्च 2022 दरम्यान प्रवासी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

HSBC कार्डवर मिळेल अतिरिक्त सवलतया ऑफरमध्ये ग्राहकांना HSBC क्रेडिट कार्डवर अतिरिक्त सवलत मिळणार आहे. ग्राहकांना अतिरिक्त 5 टक्के कॅश बॅक ऑफर मिळेल जी किमान 3000 रुपयांच्या व्यवहारावर उपलब्ध असेल आणि हा कॅशबॅक 750 रुपयांपर्यंत असेल.

फास्ट फॉरवर्डची सुविधा मिळेलया ऑफरमुळे फास्ट फॉरवर्ड 6E Flex, 6E Bagport सारख्या सुविधा फक्त 315 रुपयांच्या अतिरिक्त पेमेंटवर उपलब्ध होतील. या व्यतिरिक्त 315 रुपयांच्या अतिरिक्त देयकावर कार रेंटल देण्याची सुविधा देखील उपलब्ध असेल.

या 63 शहरांमध्ये करू शकता प्रवासआगरतळा, आग्रा, अहमदाबाद, आयजवाल, अमृतसर, औरंगाबाद, बागडोरा, बंगळुरु, बेळगाव, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, कोईम्बतूर, देहरादून, दिल्ली, दिब्रुगढ, दिमापूर, गया, गोवा, गोरखपूर, गुवाहाटी, हुबळी, हैदराबाद, इम्फाल, इंदूर, जयपूर, जम्मू, जोधपूर, जोरहाट, कन्नूर, कोची, कोल्हापूर, कोलकाता, कोझीकोडा, लेह, लखनौ, मदुराई, मंगळुरू, मुंबई, म्हैसूर, नागपूर, पाटणा, पोर्ट ब्लेअर, प्रयागराज, पुणे, रायपूर, राजमुंद्री, रांची, शिलाँग, शिर्डी, सिलचर, श्रीनगर, सुरत, त्रिचुरापल्ली, तिरुपती, त्रिवेंद्रम, तूतीकोरिन, उदयपूर, बडोदा, वाराणसी, विजयवाडा आणि विशापट्टणम मधून प्रवासी तिकिटाची बुकिंग करू शकता

टॅग्स :इंडिगोविमानविमानतळ