Join us

आकाशात रंगणार Indigo-Tataचा सामना, Air Indiaच्या विक्रीनंतर हवाई वाहतुकीतील स्पर्धा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 8:18 AM

Indigo Vs Tata: टाटा सन्सने Air India खरेदी केल्यानंतर भारतातील सर्वांत मोठी हवाई वाहतूक कंपनी असलेल्या Indigoला Tataमध्ये आपला स्पर्धक दिसू लागला आहे. त्यामुळेच यापुढे हवाई वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये इंडिगो आणि टाटा यांच्यात मोठी स्पर्धा सुरू होण्याची शक्यता दिसत आहे.

नवी दिल्ली : टाटा सन्सने एअर इंडिया खरेदी केल्यानंतर भारतातील सर्वांत मोठी हवाई वाहतूक कंपनी असलेल्या इंडिगोलाटाटामध्ये आपला स्पर्धक दिसू लागला आहे. त्यामुळेच यापुढे हवाई वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये इंडिगो आणि टाटा यांच्यात मोठी स्पर्धा सुरू होण्याची शक्यता दिसत आहे. टाटांनी २.४ अब्ज डॉलरला सरकारकडून एअर इंडिया विकत घेतले आहे. विस्तारा आणि एअरएशिया इंडिया या एअरलाइन्समध्येही टाटांची हिस्सेदारी आहे. त्यामुळे या तीन विमान कंपन्यांकडून इंडिगोला मोठी स्पर्धा सहन करावी लागणार आहे.  इंडिगोचे सीईओ रोनोंजय दत्ता यांनी सांगितले की, ‘आम्ही त्यांच्याकडे एक मजबूत स्पर्धक म्हणून पाहतो. पण, आम्ही त्यांचे स्वागत करतो. मला वाटते ते आर्थिकदृष्ट्या अधिक जबाबदार बनतील. कारण करदात्यांच्या पैशांतून चालणारा मोठा खेळाडू बाजारात असणे ही आमच्यासाठी काही निष्पक्ष स्पर्धा नव्हती.’देशांतर्गत हवाई वाहतुकीत इंडिगोचा हिस्सा अर्ध्यापेक्षा अधिक आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय वाहतुकीत एअर इंडियाचा दबदबा आहे. एअर इंडियाची मालकी आता टाटा समूहाकडे आल्याने स्पर्धा वाढेल.

टॅग्स :टाटाइंडिगोएअर इंडिया