नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जुलै या तिमाहीमध्ये अप्रत्यक्ष कराचा महसूल ३७ टक्क्यांहून अधिक वाढून २.१ लाख कोटींवर गेला आहे. अबकारी कराच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या वसुलीमुळे ही किमया घडून आली. गेल्या वर्षी याच कालावधीदरम्यान १.५३ लाख कोटी एवढा अप्रत्यक्ष कर प्राप्त झाला होता, असे अर्थ मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले. २०१५-१६ च्या जुलै महिन्यात अप्रत्यक्ष कराची वसुली पूर्वीच्या वर्षापेक्षा ३९.१ टक्क्यांनी वाढून ५६ हजार ७३९ कोटी रुपये झाली. अप्रत्यक्ष कर महसूल जुलै २०१४ च्या (४० हजार ८०२ कोटी) तुलनेत जुलै २०१५ मध्ये वाढून ५६ हजार ७३९ कोटी रुपये झाला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या काळात अप्रत्यक्ष करात ३९.१ टक्के एवढी वाढ नोंदली गेली.
अप्रत्यक्ष कर महसुलात ३७ टक्के वाढ
By admin | Published: August 12, 2015 2:15 AM