इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय व्यापार चालू वित्त वर्षात लक्षणीयरीत्या घसरला आहे, असे पाकिस्तानच्या केंद्रीय बँकेने म्हटले आहे. काश्मीर मुद्द्यावरून दोन्ही देशांत निर्माण झालेल्या तणावाचा हा परिणाम आहे.
स्टेट बँक आॅफ पाकिस्तानने गुरुवारी जारी केलेल्या माहितीनुसार, २०१९-२० च्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच १ जुलैनंतरच्या पहिल्या सहा महिन्यांत पाकिस्तानातून भारतात होणारी निर्यात प्रचंड प्रमाणात घसरून १६.८ दशलक्ष डॉलरवर आली. २०१८-१९ च्या पहिल्या सहामाहीत पाकची भारताला होणारी निर्यात तब्बल २१३ दशलक्ष डॉलर होती.
भारतातून पाकमध्ये होणारी आयातही ८६५ दशलक्ष डॉलरवरून २८६.६ दशलक्ष डॉलरवर आली आहे.
भारत-पाकिस्तान व्यापारात घसरण, काश्मिरमधील तणावाचा परिणाम
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय व्यापार चालू वित्त वर्षात लक्षणीयरीत्या घसरला आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 03:15 AM2020-01-24T03:15:52+5:302020-01-24T03:16:19+5:30