Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारत-अमेरिका व्यापार ५०० अब्ज डॉलरचा

भारत-अमेरिका व्यापार ५०० अब्ज डॉलरचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी अमेरिका दौऱ्यात अमेरिका आणि भारताने सुरक्षा आणि आर्थिक क्षेत्रात

By admin | Published: September 23, 2015 10:07 PM2015-09-23T22:07:43+5:302015-09-23T22:07:43+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी अमेरिका दौऱ्यात अमेरिका आणि भारताने सुरक्षा आणि आर्थिक क्षेत्रात

Indo-US trade is $ 500 billion | भारत-अमेरिका व्यापार ५०० अब्ज डॉलरचा

भारत-अमेरिका व्यापार ५०० अब्ज डॉलरचा

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी अमेरिका दौऱ्यात अमेरिका आणि भारताने सुरक्षा आणि आर्थिक क्षेत्रात सहकार्य अधिक बळकट करणे आणि द्विपक्षीय व्यापार पाचपट वाढवून ५०० अब्ज अमेरिकन डॉलर करण्याचे ठरविले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासह अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या पहिल्या भारत-अमेरिका व्यूहात्मक आणि व्यापारी संवादाच्या समारोपानंतर संयुक्त निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, दहशतवादाशी लढणे, व्यापारी संबंध बळकट करणे आणि अमेरिकेची गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भारतात आणणे यावर यावेळी भर देण्यात आला आहे. यावेळी सुषमा स्वराज उपस्थित होत्या. लष्कर ए तय्यबा, हक्कानी नेटवर्क आणि दाऊद कंपनीसारख्या दहशतवादी गटांबाबत दोन्ही देशांची भूमिका ही एकच असल्याचा पुनरुच्चार स्वराज यांनी केला. २००८ मधील मुंबई हल्ल्याच्या गुन्हेगारांना शिक्षा करा, असे आवाहन आम्ही पाकिस्तानला केले आहे, असेही स्वराज म्हणाल्या. अमेरिका आणि भारत दहशतवादाविरुद्ध लढण्यास एकत्रित शक्ती वापरण्यास बांधील असल्याचे केरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: Indo-US trade is $ 500 billion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.