न्यूयॉर्क - जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी पेप्सिकोच्या माजी सीईओ इंदिरा नुई यांचे नाव चर्चेत आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या एका वृत्तानुसार व्हाइट हाऊसकडून जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी इंदिरा नुई यांच्या नावाचा विचार होत आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी ते फेब्रुवारी महिन्यात आपले पद सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सध्या जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी नव्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका यांनी इंदिरा नुई यांचा उल्लेख प्रशासनिक सहाकारी तसेच मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत असा केला आहे. ट्रम्प यांच्या कन्या इव्हांका ट्रम्प जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीशी संबंधित असलेल्यांच्या निकटवर्तींय सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार सध्या जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया प्राथमिक अवस्थेत आहे. सर्वसाधारणपणे अशा महत्त्वपूर्ण पदासाठीच्या नामांकनाबाबत अंतिम निर्णय होऊपर्यंत सुरुवातीचे दावेदार स्पर्धेतून बाद होत असतात. मात्र या पदासाठी नामांकन झाल्यास इंदिरा नुई या हे पद स्वीकारणार की नाही, याबाबत काही स्पष्ट होऊ शकलेले नाही. भारतात जन्मलेल्या इंदिरा नुई यांचा समावेश जगातील शक्तिशाली महिलांमध्ये केला जातो. 1994 मध्ये पेप्सिको कंपनीत दाखल झालेल्या नुई यांनी 2006 साली कंपनीचे नेतृत्व स्वीकराले होते. त्यांच्या कार्यकाळात पेप्सिकोच्या शेअरमध्ये 78 टक्क्यांनी वाढ झाली. 12 वर्षे पेप्सिकोमध्ये काम केल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
इंदिरा नुई जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 5:57 PM
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या एका वृत्तानुसार व्हाइट हाऊसकडून जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी इंदिरा नुई यांच्या नावाचा विचार होत आहे.
ठळक मुद्देजागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी पेप्सिकोच्या माजी सीईओ इंदिरा नुई यांचे नाव चर्चेत आहे. व्हाइट हाऊसकडून जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी इंदिरा नुई यांच्या नावाचा विचार जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम फेब्रुवारी महिन्यात आपले पद सोडणार