Lokmat Money > बिझनेस न्यूज > IndusInd Bank Q1 Result : पहिल्या तिमाहीत इंडसइंड बँकेची तुफान कमाई, नफा ३३ टक्क्यांनी वाढला

IndusInd Bank Q1 Result : पहिल्या तिमाहीत इंडसइंड बँकेची तुफान कमाई, नफा ३३ टक्क्यांनी वाढला

देशातील सर्वात मोठी खाजगी बँक इंडसइंड बँकेनं पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 02:45 PM2023-07-19T14:45:07+5:302023-07-19T14:45:35+5:30

देशातील सर्वात मोठी खाजगी बँक इंडसइंड बँकेनं पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले.

IndusInd Bank Q1 Result earnings storm in Q1 net profit up 33 percent 2124 crores rupees details | IndusInd Bank Q1 Result : पहिल्या तिमाहीत इंडसइंड बँकेची तुफान कमाई, नफा ३३ टक्क्यांनी वाढला

IndusInd Bank Q1 Result : पहिल्या तिमाहीत इंडसइंड बँकेची तुफान कमाई, नफा ३३ टक्क्यांनी वाढला

देशातील सर्वात मोठी खाजगी बँक इंडसइंड बँकेनं मंगळवारी पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. जून तिमाहीत बँकेच्या निव्वळ नफ्यात 32.5 टक्के वाढ झाली असून तो वाढून 2124 कोटी रुपये झाली. कंपनीचे पहिल्या तिमाहीत एकूण उत्पन्न वार्षिक 28 टक्क्यांनी वाढून 12,939 कोटी रुपये झालं आहे. या कालावधीत बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 18 टक्क्यांनी वाढून 4,867 कोटी रुपये झाले. त्याच वेळी, प्रोव्हिजन्स आणि आकस्मिक खर्चापूर्वी बँकेचा ऑपरेटिंग नफा 13 टक्क्यांनी वाढून 3830 कोटी रुपये झाला आहे. या कालावधीसाठी प्रोव्हिजन्स 992 कोटी रुपये होत्या. तर वर्षभरापूर्वी त्या 1251 कोटी रुपये होते.

ग्रॉस एनपीए रेश्यो किती?
जून तिमाहीत विक्रीच्या टक्केवारीच्या रुपात ग्रॉस एनपीए रेश्यो 1.94 टक्को होता. गेल्या तिमाहीत तो 1.98 टक्के होता. त्याच वेळी, वर्षभरापूर्वी याच कालावधीत ग्रॉस एनपीओ रेश्यो 2.35 टक्के होता. जून तिमाहीत निव्वळ एनपीए रेश्यो 0.58 टक्के होता. मागील तिमाहीत तो 0.59 टक्के होता. त्याच वेळी, वर्षभरापूर्वी याच कालावधीत तो 0.67 टक्के होता. बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन किंवा NIM मध्ये सुधारणा होऊन 4.29 टक्के झाले आहे. वर्षभरापूर्वी तो 4.21 टक्के होता. त्याच वेळी, मागील तिमाहीत तो 4.28 टक्के होता.

कन्सोलिडेटेड आकडेवारी
कन्सोलिडेटेड आकडेवारीबद्दल बोलायचं तर, बँकेचं कन्सोलिडेटेड निव्वळ व्याज उत्पन्न 18 टक्क्यांनी वाढून 4,867 कोटी रुपये झाले आहे. या आकडेवारीमध्ये बँकेच्या पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या भारत फायनान्शियल इन्क्लुजनच्या आर्थिक डेटाचा समावेश आहे. एकत्रित निव्वळ नफ्याबद्दल सांगायचं झाल्यास, मजबूत व्याज उत्पन्नामुळे त्यात 30 टक्क्यांची वाढ होऊन तो 2124 कोटी रुपये झाला आहे.

Web Title: IndusInd Bank Q1 Result earnings storm in Q1 net profit up 33 percent 2124 crores rupees details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.