नवी दिल्ली : कारखाना क्षेत्राची कामगिरी सुस्तावल्याने औद्योगिक चक्राची गती मंदावली असून, मे महिन्यात औद्योगिक उत्पादनाचा वृद्धीदर घसरत २.७ टक्क्यांवर आला आहे. औद्योगिक क्षेत्राची ही कमकुवत स्थिती भारतीय रिझर्व्ह बँकेला व्याजदरात घट करण्याच्या दृष्टीने पूरक ठरते.
मे २०१४ मध्ये औद्योगिक उत्पादनाचा वृद्धीदर ५.६ टक्के होता. एप्रिल २०१५ च्या सुधारित औद्योगिक उत्पादन निर्देशांक ३.३६ टक्क्यांवर आला आहे. हा निर्देशांक ४.१ टक्के असेल, असा अंदाज होता.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत वृद्धीदर ३ टक्के होता. एप्रिल-मे २०१४-१५ या अवधीत औद्योगिक उत्पादनाचा वृद्धीदर ४.६ टक्के होता. सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कारखाना क्षेत्राची कामगिरी ढेपाळली आहे. तथापि, खान क्षेत्राची कामगिरी काहीशी सुधारल्याचे दिसते.
वीजनिर्मिती क्षेत्राचा वृद्धीदरही गेल्या वर्षातील मे महिन्याच्या तुलनेत ६ टक्क्यांवर आला आहे. कारखाना क्षेत्राचा वृद्धीदर २.२ टक्के असून मागच्या वर्षातील मे महिन्यात हा दर ५.९ टक्के होता. औद्योगिक उत्पादन निर्देशांक सर्वाधिक ७५ टक्के भारांश कारखाना क्षेत्राचा असतो. या अवधीत ग्राहकोपयोगी वस्तू, भांडवली वस्तू क्षेत्राचीही गती धीमावली.
औद्योगिक चक्राची गती धीमावली; वृद्धीदर २.७ टक्क्यांवर
कारखाना क्षेत्राची कामगिरी सुस्तावल्याने औद्योगिक चक्राची गती मंदावली असून, मे महिन्यात औद्योगिक उत्पादनाचा वृद्धीदर घसरत २.७ टक्क्यांवर आला आहे.
By admin | Published: July 10, 2015 11:04 PM2015-07-10T23:04:39+5:302015-07-10T23:04:39+5:30