Join us

औद्योगिक उत्पादन निर्देशांक, चलनवाढीने दिला हात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 3:15 AM

मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाचा प्रारंभ मंदीने झाला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३५,२०४.६६ असा खुला झाला

निवडणुकीची सेमीफायनल आणि रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांचा तडकाफडकी आलेला राजीनामा या धक्क्यामधून बाजाराला सावरण्यासाठी हात दिला, तो गतसप्ताहात जाहीर झालेल्या विविध अर्थविषयक आकडेवारीने. वाढलेले औद्योगिक उत्पादन आणि घसरलेल्या चलनवाढीच्या दराने बाजाराला सावरले. यामुळे सप्ताहाच्या अखेरीस बाजाराच्या निर्देशांकांमध्ये वाढ झालेली बघावयास मिळाली.

मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहाचा प्रारंभ मंदीने झाला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३५,२०४.६६ असा खुला झाला. त्यानंतर, तो ३६,०९५.५६ ते ३४,४२६.२९ अंशांच्या दरम्यान हेलकावत सप्ताहाच्या अखेरीस ३५,९६२.९३ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये २८९.६८ अंशांनी (०.८१ टक्के) नाममात्र वाढ झाली आहे.राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)मध्येही सप्ताहाच्या प्रारंभी घट झाली. मात्र, नंतर तो स्थिरावला. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक १०,८०५.४५ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहापेक्षा त्यात १११.७५ अंशांनी (१.०४ टक्के) वाढ झाली आहे. मिडकॅप व स्मॉलकॅप या बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकामध्येही वाढ झालेली दिसून आली. सप्ताहाच्या अखेरीस मिडकॅप ४७५.३५ अंश (३.२३ टक्के) वाढून १५,१९२.८४ अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅप १४,५०१.७६ अंशांवर बंद झाला. त्यामध्ये ३९७.११ अंश (२.८२ टक्के) वाढ झाली आहे.रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी दिलेला राजीनामा आणि पाच राज्यांच्या निकालामध्ये भाजपाला बसलेला फटका, यामुळे बाजार काही काळ घसरला, पण नंतर तो सावरला. अन्नधान्य आणि इंधनाच्या दरात घट झाल्याने चलनवाढीचा दर खाली आला, तर उत्पादन आणि खाण क्षेत्राच्या कामगिरीमुळे देशातील औद्योगिक उत्पादन वाढले. याचे बाजाराने वाढीने स्वागत केले. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची बैठक येत्या सप्ताहात होणार असून त्याकडे बाजाराचे लक्ष आहे.संवेदनशील निर्देशांकात दोन नवीन आस्थापनाच्सोमवार दि. २४ डिसेंबरपासून मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकामध्ये समावेश असलेल्या ३० आस्थापनांमध्ये दोन नवीन आस्थापना घेतल्या जाणार आहेत, तर दोन आस्थापनांना डच्चू दिला जाणार आहे. बजाज फायनान्स आणि एचसीएल टेक या नवीन आस्थापनांचा निर्देशांकामध्ये समावेश होणार आहे.च्याच दिवशी सध्या निर्देशांकामध्ये असलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो आणि अदानी पोर्टस् या दोन आस्थापना वगळल्या जाणार आहेत. या बदलामुळे संवेदनशील निर्देशांकामधील आर्थिक क्षेत्राचा टक्का आणखी वाढणार आहे.च्१ जानेवारी, १९८६ रोजी या निर्देशांकाची सुरुवात झाली असून, तो भारतामधील पहिला शेअर निर्देशांक आहे. मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या सुप्रस्थापित आणि बहुतांश व्यवहार होणाऱ्या ३० आस्थापनांचा या निर्देशांकामध्ये समावेश असतो. याच्या घटकांमध्ये बदलही केला जातो.

टॅग्स :निर्देशांकमुंबई