Join us

उद्याेगपती रतन टाटा यांचा ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ने गाैरव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 8:44 AM

रतन टाटा यांच्या सन्मानाबद्दल देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. 

मुंबई : टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचा ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा ऑस्ट्रेलियाचा सर्वाेच्च नागरी सन्मान प्रदान करून गाैरव करण्यात आला. ऑस्ट्रेलियाचे राजदूत बॅरी ओ फॅरेल यांनी ही माहिती दिली. फॅरेल यांनी रतन टाटा यांना पुरस्कार प्रदान करतानाचे छायाचित्र ट्वीट केले आहे. रतन टाटा यांनी केवळ भारतातच नव्हे तर ऑस्ट्रेलियामध्ये महत्त्वपूर्ण याेगदान देऊन माेठा प्रभाव पाडला आहे, असे फॅरेल यांनी म्हटले. रतन टाटा यांच्या सन्मानाबद्दल देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. 

यापूर्वी यांचा सन्मान

यापूर्वी हा सन्मान दिवंगत मदर टेरेसा (१९८२), माजी ॲटर्नी जनरल साेली साेराबजी (२००६), क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (२०१२) व बायाेकाॅनच्या किरण मजूमदार-शाॅ (२०२०) यांना प्रदान करण्यात आला आहे.

टॅग्स :रतन टाटाव्यवसायआॅस्ट्रेलिया