नवी दिल्ली : उद्योग-व्यावसायिक आणि छोट्या करदात्यांना प्रस्तावित नव्या थेट करसंहितेचा सर्वाधिक फायदा होईल, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. सूत्रांनी सांगितले की, नव्या थेट करसंहितेचा मसुदा जुलैपर्यंत तयार होईल. कंपनी कर २५ टक्क्यांवर आणण्याचा सरकारचा अजेंडा ही संहिता पुढे नेईल. वैयक्तिक करदात्यांना आणखी दिलासा मिळेल.सूत्रांनी सांगितले की, कंपनी कर २५ टक्के करण्यामागे उद्योजक व व्यावसायिकांना अधिक स्पर्धात्मक करणे हा उद्देश आहे. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये औद्योगिक करांचे दर अत्यंत कमी आहेत. त्या बळावर ते गुंतवणूकदारांना आकर्षित करीत आहेत. त्यामुळे दर कमी करणे भारतासाठीही आवश्यक आहे.अशोक माहेश्वरी अॅण्ड असोसिएटस्चे भागीदार अमित माहेश्वरी यांनी सांगितले की, बहुतांश अत्याधुनिक अर्थव्यवस्थांत कंपन्यांपेक्षा वैयक्तिक करदात्यांना जास्त दराने कर लावला जातो. गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती याला प्रोत्साहन देण्यासाठी कंपन्यांना कमी दर लावला जातो.>करदाते वाढवण्याचे धोरणनव्या संहितेत आयकराचे दर कमी करण्यात येणार आहेत. दर कमी करून करदाते वाढविण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. वित्त वर्ष २0१४ ते २0१८ या काळात कर विवरणपत्रे भरणाऱ्यांच्या संख्येत ८0 टक्के वाढ झाली आहे. विवरणपत्रे भरणाºयांचा आकडा आता ६८.४ दशलक्षांवर गेला आहे. सर्वोच्च आयकर स्तर ३0 टक्क्यांवर कायम राहणार आहे. कारण हा स्तर जगात सर्वांत कमी आहे. छोट्या करदात्यांना मात्र दिलासा दिला जाईल. छोट्या करदात्यांचा आयकर कमी केल्यास सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २0१९च्या लोकसभा निवडणुकीत लाभ होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
उद्योग आणि करदात्यांना होणार नव्या थेट करसंहितेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 5:00 AM