Join us  

४.४१ टक्क्यांनी वाढली महागाई

By admin | Published: October 12, 2015 10:24 PM

डाळी, खाद्यपदार्थ महागल्यामुळे सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर वाढून ४.४१ टक्के झाला. दरम्यान, वस्तू निर्माण, खाण काम आणि भांडवली वस्तूंना चांगला उठाव

नवी दिल्ली : डाळी, खाद्यपदार्थ महागल्यामुळे सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर वाढून ४.४१ टक्के झाला. दरम्यान, वस्तू निर्माण, खाण काम आणि भांडवली वस्तूंना चांगला उठाव असल्यामुळे गेल्या आॅगस्टमध्ये औद्योगिक उत्पादनात तीन वर्षांतील सर्वाधिक ६.४ टक्के वाढ झाली. गेल्या वर्षी कारखान्यांतील उत्पादनात ०.५ टक्के वाढ झाली होती.डाळी, खाद्यपदार्थ महागल्यामुळे सप्टेंबरमध्ये किरकोळ चलनवाढ ४.४१ टक्के होती. ग्राहक किमत निर्देशांकावर आधारित ही चलनवाढ आॅगस्टमध्ये ३.७४ टक्के होती. कारण त्यावेळी भाज्या,फळे आणि प्रथिनांंनीयुक्त अशा गोष्टी स्वस्त होत्या, असे सरकारने सोमवारी सांगितले. आॅगस्टमध्ये चलनवाढ ३.६६ टक्के असेल असा सरकारचा अंदाज होता तो आता ३.७४ टक्के असा सुधारून घेण्यात आला आहे. ग्राहक चलनवाढीचा आढावा घेण्यात येत आहे. ती गेल्यावर्षी आॅगस्टमध्ये ५.६३ टक्के होती ती खाली आल्याचा अंदाज आहे. गेल्या आॅगस्टमध्ये खाद्यपदार्थांतील चलनवाढ २.२० टक्के होती ती सप्टेंबरमध्ये ३.८८ टक्के झाली.औद्योगिक उत्पादन एप्रिल ते आॅगस्ट कालावधीत ४.१ टक्के होते. गेल्या वर्षी ते ३ टक्के होते. औद्योगिक उत्पादनाची मोजणी ही औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांकावर (आयआयपी) होते. ही आकडेवारी केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने सोमवारी दिली. हा निर्देशांक आॅक्टोबर २०१२ मध्ये ८.४ टक्क्यांनी वाढला होता व त्यानंतर तो गेल्या आॅगस्टमध्ये सर्वाधिक म्हणजे ६.४ टक्क्यांवर आला होता.एप्रिल ते आॅगस्ट कालावधीत भांडवली वस्तुंचे उत्पादन ७.४ टक्क्यांनी वाढले. ते गेल्यावर्षी ४.८ टक्के होते. गुंतवणुकीचा निकष म्हणजे भांडवली वस्तुंचे उत्पादन समजले जाते. ते अतिशय जोरदार म्हणजे २१.८ टक्के वाढले. हे उत्पादन गेल्यावर्षी याच कालावधीत १० टक्के होते.