Join us

महागाईचा तुमच्या सेव्हिंग्सवरही होतोय परिणाम; २०, २५ वर्षांनंतर अर्धे होईल १ कोटींचे मूल्य, पाहा कसे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 12:15 PM

तुम्ही आज जी गुंतवणूक करताय त्याचं १५-२० वर्षांनंतर मूल्य किती असेल याचा कधी विचार केलाय का.

Inflation Calculator: तुम्हीही तुमच्या भविष्यासाठी गुंतवणूक करत असाल. तुम्ही कोणत्या फायनान्शिअल इन्स्ट्रूमेंट्समध्ये पैसे गुंतवता? तुम्ही आज जी गुंतवणूक करताय त्याचं १५-२० वर्षांनंतर मूल्य किती असेल याचा कधी विचार केलाय का. आज जो प्लॅन केलाय तो २० वर्षानंतरसाठी योग्य ठरेल का? याचा विचार तुम्ही केलाय का. सेव्हिंग्स आणि रिटर्नच्या या शर्यतीत महागाईला विसरून चालणार नाही. बहुतांश लोक ही चूक करतात. महागाई तुमची बचत कशाप्रकारे कमी करत आहे आणि १५, २० किंवा २५ वर्षांनी १ कोटींचं मूल्य किती होईल हे समजून घेणं आवश्यक आहे.

१ कोटींचं टार्गेट वाटेल कमीसामान्यत: आपण येणाऱ्या २०-२५ वर्षांसाठी सेव्हिंग करतो. आपण १ कोटींचं टार्गेटही ठेवतो. परंतु ते २० वर्षांनंतर पूर्ण होईल का. व्हॅल्यूच्या हिशोबानं तर ते पूर्ण होईल. परंतु महागाईच्या हिशोबानं ते कमी वाटेल. आजच्या काळात रिटारमेंटसाठी १ कोटी रूपये आपल्याला योग्य वाटतात. पण २५ वर्षांनंतर असं होणार नाही. ज्या प्रकारे ५-६ टक्क्यांच्या हिशोबानं महागाई वाढत आहे, त्यानुसार २५ वर्षानंतर १ कोटींचं मूल्य अर्ध होईल. 

२० वर्षांत तुमची गुंतवणूक - विना महागाई अॅ़डजस्टमेंटमासिक गुंतवणूक - १० हजार रुपयेकालावधी - २० वर्षेअंदाजे रिटर्न - १२ टक्के२० वर्षांनंतर एसआयपीची व्हॅल्यू - १ कोटी

२० वर्षांनी तुमची गुंतवणूक - महागाई अॅडजस्टेडमासिक गुंतवणूक - १० हजार रुपयेकालावधी - २० वर्षेअंदाजे रिटर्न - १२ टक्केमहागाई ६ टक्के वार्षिकमहागाई अँडजस्टेड व्हॅल्यू- ४६ लाख

२५ वर्षांत तुमची गुंतवणूक - विना महागाई अॅ़डजस्टमेंटमासिक गुंतवणूक - १० हजार रुपयेकालावधी - २५ वर्षेअंदाजे रिटर्न - १२ टक्के२५ वर्षांनंतर एसआयपीची व्हॅल्यू - १.९ कोटी

२५ वर्षांनी तुमची गुंतवणूक - महागाई अॅडजस्टेडमासिक गुंतवणूक - १० हजार रुपयेकालावधी - २५ वर्षेअंदाजे रिटर्न - १२ टक्केमहागाई ६ टक्के वार्षिकमहागाई अँडजस्टेड व्हॅल्यू- ६९ लाख

गेल्या २० वर्षांमध्ये असे अनेक फंड्स आहेत ज्यांनी वार्षिक १२-१५ टक्के रिटर्न दिले आहेत. यामध्ये निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड, एसबीआय लार्ज अँड मिडकॅप फंड, डिएसपी इक्विटी अपॉर्च्युनिटी फंड, एचडीएफसी टॉप १०० फंड्स यांचा समावेश आहे.(टीप - यामध्ये फंड्सच्य कामगिरीविषयी माहिती देण्यात आलीये. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :पैसागुंतवणूक