Join us

महागाईने फळांचा गोडवा घटला

By admin | Published: August 07, 2015 9:53 PM

सध्या कोकिळा व्रतासह इतरही धार्मिक उपवासाचे दिवस सुरू असून फळांना चांगली मागणी असल्याने त्यांना चांगला भावही मिळत आहे़ परदेशातून येणारे सफरचंद

राम जाधव, जळगावसध्या कोकिळा व्रतासह इतरही धार्मिक उपवासाचे दिवस सुरू असून फळांना चांगली मागणी असल्याने त्यांना चांगला भावही मिळत आहे़ परदेशातून येणारे सफरचंद व द्राक्षे तर सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत़या वर्षीच्या पाऊसमानाचा फळउत्पादनालाही फटका बसला आहे़ तसेच १८ वर्षांनंतर या वर्षी आलेल्या कोकिळाव्रताच्या उपवासासाठी महिला वर्गातून मोठ्या प्रमाणावर फळांची मागणी होत आहे़ त्यामुळे सध्या बाजारपेठेत सर्वच फळांचे भाव वाढलेले आहेत़ जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्ह्यातील यावल, रावेर, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर व चाळीसगाव या भागातून डाळिंब, पपई व मोसंबीची आवक होत आहे़ पपईची आवक घटल्याने किलोमागे पाच ते सात रुपयांनी भाव वाढले. विदेशी सफरचंदाला भाव़़़सफरचंदाचे भाव १६० ते १८० रुपये किलोवर असल्याने सध्यातरी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत़ या आठवड्यापासून शिमलाचा माल येत असल्याने त्याला ११० ते १२० रुपये प्रती किलोला भाव मिळत आहे़ तर परदेशातून येणारा माल संपत आल्याने त्याच्या किमतीत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे़ मात्र स्थानिक माल वाढल्यास भाव कमी होण्याची अपेक्षा आहे.द्राक्षे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरपरदेशातून येणाऱ्या वॉशिंग्टनच्या द्राक्षांना ३२० रुपये प्रती किलो भाव मिळत आहे़ लालसर व मध्ये बी असलेले हे द्राक्ष चवीलाही गोड असल्याने चांगलाच भाव खात आहेत़ त्यामुळे सध्यातरी हे द्राक्ष सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत़ स्थानिक द्राक्षे बाजारपेठेत यायला अजून अवधी असून साधारण डिसेंबर महिन्यात ती बाजारात येण्याची शक्यता आहे़ डाळिंबांची आवक चांगली ....मागील वर्षी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे डाळिंबाचा हंगाम लांबणीवर पडत गेला़ त्यामुळे बहुतेक ठिकाणचा माल आता तयार झाल्याने बाजारपेठेतील आवक एकदमच वाढली आहे़ परिणामी डाळिंबाचे भाव काहीसे मर्यादित असल्याने ग्राहकांसाठी तेवढाच एक दिलासा मिळत आहे़ सध्या डाळिंबाला किरकोळ बाजारात ६० ते १२० रुपये असा प्रतीनुसार भाव मिळत आहे़ सध्या बाजारात पपई, मोसंबी व डाळिंबाची जिल्ह्यातून आवक होत आहे़ येणाऱ्या मालाला त्याच्या प्रतीनुसार भाव मिळतोय. स्थानिक चिकूची आवक बंद असून सध्या गुजरातमधील चिकूची आवक सुरू आहे़ पपईची आवक घटल्याने तिच्या भावात वाढ होत आहे़- अशोक जोशी, आडत व्यापारी, कृ़उ़बा़स़ जळगाव़