Lokmat Money > बिझनेस न्यूज > CNG Prices Hike : मतदान संपताच महागाईचा चटका...! दिल्ली-NCR सह अनेक शहरांत CNG च्या किंमती वाढल्या

CNG Prices Hike : मतदान संपताच महागाईचा चटका...! दिल्ली-NCR सह अनेक शहरांत CNG च्या किंमती वाढल्या

दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक शहरांमध्ये CNG च्या किंमती 50 पैसे ते 1 रुपये प्रति किलोपर्यंत वाढल्या आहेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 09:15 PM2022-03-07T21:15:44+5:302022-03-07T21:16:55+5:30

दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक शहरांमध्ये CNG च्या किंमती 50 पैसे ते 1 रुपये प्रति किलोपर्यंत वाढल्या आहेत...

Inflation hits after the 5 states assembly polls CNG prices hike in several cities, including Delhi-NCR | CNG Prices Hike : मतदान संपताच महागाईचा चटका...! दिल्ली-NCR सह अनेक शहरांत CNG च्या किंमती वाढल्या

CNG Prices Hike : मतदान संपताच महागाईचा चटका...! दिल्ली-NCR सह अनेक शहरांत CNG च्या किंमती वाढल्या

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील मतदान संपताच, महागाईचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक शहरांमध्ये CNG च्या किंमती 50 पैसे ते 1 रुपये प्रति किलोपर्यंत वाढल्या आहेत (CNG prices hike). या नव्या किंमती मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतील.

या राज्यांत वाढल्या किंमती -
दिल्ली-एनसीआर -

- राजधानी दिल्लीमध्ये CNG ची किंमती 57.01 रुपये प्रति किलोवरून 50 पैशांनी वाढून 57.51 रुपये किलोवर पोहोचल्या आहेत. 
- नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाजियाबादमध्ये CNG ची किंमत 1 रुपयांनी वाढली आहे. या तीनही ठिकाणी आता CNG 58.58 रुपये प्रति किलो ऐवजी 59.58 रुपये प्रति किलोने मिळेल

हरियाणा -
- गुरुग्राम येथे उद्यापासून CNG 65.38 रुपये प्रति किलो ऐवजी 65.88 रुपये प्रति किलो मिळेल. रेवाडी येथेही 50 पैशांची वाढ होऊन CNG ची किंमत 67.98 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
- करनाल आणि कॅथल येथेही 50-50 पैशांची वाढ झाली असून या दोन्ही ठिकाणी उद्यापासून CNG 65.68 रुपये प्रति किलो ऐवजी 66.18 रुपये प्रति किलो प्रमाणे मिळेल.

उत्तर प्रदेश -
- उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर आणि कानपूर या दोन शहरांमध्ये सीएनजीची किंमत 1 रुपयाने वाढविण्यात आली आहे. आता मुझफ्फरनगरमध्ये CNG 63.28 रुपये प्रति किलो ऐवजी 64.28 रुपये प्रति किलोने मिळेल. तर कानपूरमध्ये प्रति किलोसाठी 67.82 रुपयां ऐवजी 68.82 रुपये मोजावे लागतील.

राजस्थान -
- अजमेरमध्येही CNG ची किंमत 50 पैसे प्रति किलो वाढविण्यात आली आहे. मंगळवारी सकाळपासून येथे CNG ची किंमत 67.31 रुपये प्रति किलोवरून 67.81 रुपये प्रति किलो होईल.

Web Title: Inflation hits after the 5 states assembly polls CNG prices hike in several cities, including Delhi-NCR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.