उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील मतदान संपताच, महागाईचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक शहरांमध्ये CNG च्या किंमती 50 पैसे ते 1 रुपये प्रति किलोपर्यंत वाढल्या आहेत (CNG prices hike). या नव्या किंमती मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतील.
या राज्यांत वाढल्या किंमती -दिल्ली-एनसीआर -- राजधानी दिल्लीमध्ये CNG ची किंमती 57.01 रुपये प्रति किलोवरून 50 पैशांनी वाढून 57.51 रुपये किलोवर पोहोचल्या आहेत. - नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाजियाबादमध्ये CNG ची किंमत 1 रुपयांनी वाढली आहे. या तीनही ठिकाणी आता CNG 58.58 रुपये प्रति किलो ऐवजी 59.58 रुपये प्रति किलोने मिळेल
हरियाणा -- गुरुग्राम येथे उद्यापासून CNG 65.38 रुपये प्रति किलो ऐवजी 65.88 रुपये प्रति किलो मिळेल. रेवाडी येथेही 50 पैशांची वाढ होऊन CNG ची किंमत 67.98 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.- करनाल आणि कॅथल येथेही 50-50 पैशांची वाढ झाली असून या दोन्ही ठिकाणी उद्यापासून CNG 65.68 रुपये प्रति किलो ऐवजी 66.18 रुपये प्रति किलो प्रमाणे मिळेल.
उत्तर प्रदेश -- उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर आणि कानपूर या दोन शहरांमध्ये सीएनजीची किंमत 1 रुपयाने वाढविण्यात आली आहे. आता मुझफ्फरनगरमध्ये CNG 63.28 रुपये प्रति किलो ऐवजी 64.28 रुपये प्रति किलोने मिळेल. तर कानपूरमध्ये प्रति किलोसाठी 67.82 रुपयां ऐवजी 68.82 रुपये मोजावे लागतील.
राजस्थान -- अजमेरमध्येही CNG ची किंमत 50 पैसे प्रति किलो वाढविण्यात आली आहे. मंगळवारी सकाळपासून येथे CNG ची किंमत 67.31 रुपये प्रति किलोवरून 67.81 रुपये प्रति किलो होईल.