नवी दिल्ली : ठोक महागाई दर जानेवारीत ५.२५ टक्के आहे. ३० महिन्यांतील हा उच्च स्तर आहे. तथापि, अन्न पदार्थांचे दर स्थिर असूनही जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वृद्धीमुळे देशांतर्गत इंधनाचे दरही वाढले. त्यामुळे ठोक महागाई वाढली आहे.
ठोक मूल्य निर्देशांक आधारित महागाई दरातील वार्षिक वृद्धी दर्शविते. डिसेंबर २०१६ मध्ये महागाई दर ३.३९ टक्के होता. यापूर्वी जुलै २०१४ मध्ये हा दर सर्वाधिक ५.४१ टक्क्यांवर होता. वाणिज्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाई जानेवारीत दुप्पट होऊन १८.१४ टक्के आहे. डिसेंबर २०१६ मध्ये हा दर ८.६५ टक्के होता. डिझेलच्या दरात या महिन्यात ३१.१० टक्के आणि पेट्रोलच्या दरात १५.६६ टक्के वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचे उत्पादन करणाऱ्या देशांची संघटना ओपेकने डिसेंबरमध्ये आठ वर्षांनंतर प्रथमच आपले उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात याच्या दरात वाढ झाली. त्यामुळे देशांतर्गत इंधनाच्या दरात वाढ झाली. मंत्रालयातील आकडेवारीनुसार, अन्न क्षेत्रात सलग दुसऱ्या महिन्यात महागाईत घट दिसून आली. जानेवारीत हे दर शून्य ते ०.५६ टक्के खाली आले होते, तर डिसेंबरमध्ये हे दर शून्य ते ०.७० टक्के घसरले होते.
भाज्यांमध्ये ठोक महागाई जानेवारीत शून्य ते ३२.३२ टक्के घसरली आहे. सलग पाचव्या महिन्यात महागाईतील ही घसरण आहे. कांद्याच्या दरातही शून्य ते २८.८६ टक्के घसरण झाली आहे. डाळींचा महागाई दर जानेवारीत ६.२१ टक्के होता. डिसेंबरमध्ये हा दर १८.१२ टक्के होता. अंडी, मांस आणि मासे यांच्या दरात ३.५९ टक्के वाढ झाली. उत्पादित वस्तूंचा महागाई दर जानेवारीत ३.९९ टक्क्यांनी वाढला. डिसेंबरमध्ये तो ३.६७ टक्के होता. साखरेच्या दरात जानेवारीत २२.८३ टक्के वाढ झाली. रिझर्व्ह बँकेने जानेवारी ते मार्च या तिमाहीत महागाई ५ टक्क्यांच्या आत ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे, पण इंधनाच्या दरात जागतिक स्तरावर होत असलेल्या वृद्धीमुळे आगामी आर्थिक वर्षात महागाईवर दबाव राहू शकतो.
इंधनामुळे महागाई ‘पेटली’!
ठोक महागाई दर जानेवारीत ५.२५ टक्के आहे. ३० महिन्यांतील हा उच्च स्तर आहे. तथापि, अन्न पदार्थांचे दर स्थिर असूनही जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात
By admin | Published: February 14, 2017 11:54 PM2017-02-14T23:54:42+5:302017-02-14T23:54:42+5:30