Lokmat Money > बिझनेस न्यूज > महागाई, मंदी, नोकर कपात! यंदा किती पगारवाढ होणार? कोणत्या क्षेत्रात नोकऱ्यांची लाट येणार...

महागाई, मंदी, नोकर कपात! यंदा किती पगारवाढ होणार? कोणत्या क्षेत्रात नोकऱ्यांची लाट येणार...

salary increment: सध्याचा वेळ हा संपूर्ण आर्थिक वर्षाचा महत्वाचा भाग असतो. यातच सारा मेळ घातला जातो. कोणी किती काम केले. कोणी कमी, कोणी जास्त केले आदी गोष्टी पाहिल्या जातात.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 12:24 PM2023-03-27T12:24:36+5:302023-03-27T12:26:03+5:30

salary increment: सध्याचा वेळ हा संपूर्ण आर्थिक वर्षाचा महत्वाचा भाग असतो. यातच सारा मेळ घातला जातो. कोणी किती काम केले. कोणी कमी, कोणी जास्त केले आदी गोष्टी पाहिल्या जातात.

Inflation, recession, job cuts! How much salary increase this year? In which sector there will be a wave of new jobs... | महागाई, मंदी, नोकर कपात! यंदा किती पगारवाढ होणार? कोणत्या क्षेत्रात नोकऱ्यांची लाट येणार...

महागाई, मंदी, नोकर कपात! यंदा किती पगारवाढ होणार? कोणत्या क्षेत्रात नोकऱ्यांची लाट येणार...

आता पगारवाढीचे वारे सुरु झाले आहेत. छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये पुढील वर्षीचे टार्गेट यंदा काय काय झाले याचा उहापोह सुरु झालेला आहे. अमेरिका, युरोपसह अनेक देशांत सध्या महागाई आणि मंदीने साऱ्यांना सपाट करण्यास सुरुवात केली आहे. अनेक कंपन्य़ांमध्ये कर्मचारी कपात देखील केली जात आहे. असे असताना यंदा पगारवाढ होणार का, झाली तर किती होणार आदी प्रश्न उभे राहू लागले आहेत. 

सध्याचा वेळ हा संपूर्ण आर्थिक वर्षाचा महत्वाचा भाग असतो. यातच सारा मेळ घातला जातो. कोणी किती काम केले. कोणी कमी, कोणी जास्त केले आदी गोष्टी पाहिल्या जातात. यानंतरच त्या कर्मचाऱ्यांना कमी-अधिक पगारवाढ दिली जाते. कोणाला प्रमोशन दिले जाते. 

भारतात २०२३ मध्ये सरासरी 10.2 टक्के पगारवाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काहींना ५ टक्के काहींना १५ टक्के पगारवाढ मिळेल. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 'फ्यूचर ऑफ पे' अहवाल 2023 नुसार भारतातील सरासरी पगार 10.2 टक्क्यांनी वाढणार आहे. 2022 मध्ये ही पगारवाढ १०.४ टक्के झाली होती. याच्या तुलनेत ही पगारवाढ काहीसी कमीच असणार आहे. 

कोणत्या क्षेत्रात जास्त...
या वर्षी सर्वाधिक पगारवाढ ही तंत्रज्ञानाशी संबंधीत अशा तीन सेक्टरमध्ये होण्याचा अंदाज आहे. 2023 मध्ये ई-कॉमर्स क्षेत्रात सर्वाधिक 12.5 टक्के पगारवाढीचा अंदाज आहे. प्रोफेशनल सर्विसेज सेक्टरमध्ये 11.9 टक्के पगारवाढ अपेक्षित आहे. जगभरात आयटी क्षेत्रात नोकऱ्या जात असल्या तरी भारतात याचा परिणाम कमी दिसत आहे. यामुळे आयटी क्षेत्रात 10.8 टक्के पगारवाढीचा अंदाज आहे. 

नव्या नोकऱ्यांची संधी
EY अहवालानुसार देशात क्षय ऊर्जा, ई-कॉमर्स, डिजिटल सेवा, आरोग्य सेवा, दूरसंचार, शैक्षणिक सेवा, रिटेल आणि लॉजिस्टिकसह आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. अमेरिका, युरोपमधील मोठमोठ्या बँका बुडत आहेत. यामुळे कमी खर्चासाठी या देशांतील रोजगार भारताकडे वळण्याची शक्यता आहे. 

Web Title: Inflation, recession, job cuts! How much salary increase this year? In which sector there will be a wave of new jobs...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.