Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेपेक्षा महागाई अधिक वाढली, प्रत्यक्षात ७ वर जाणार?

रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेपेक्षा महागाई अधिक वाढली, प्रत्यक्षात ७ वर जाणार?

देशात भाजीपाल्याच्या किमती वाढत असून, त्याचा परिणाम म्हणून डिसेंबरमध्ये किरकोळ क्षेत्रातील महागाई पाच वर्षांच्या उच्चांकावर जाण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 03:00 AM2020-01-11T03:00:16+5:302020-01-11T07:02:33+5:30

देशात भाजीपाल्याच्या किमती वाढत असून, त्याचा परिणाम म्हणून डिसेंबरमध्ये किरकोळ क्षेत्रातील महागाई पाच वर्षांच्या उच्चांकावर जाण्याची शक्यता आहे.

Inflation rises higher than the Reserve Bank expects, will it actually go up to 2? | रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेपेक्षा महागाई अधिक वाढली, प्रत्यक्षात ७ वर जाणार?

रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेपेक्षा महागाई अधिक वाढली, प्रत्यक्षात ७ वर जाणार?

बंगळुरू : देशात भाजीपाल्याच्या किमती वाढत असून, त्याचा परिणाम म्हणून डिसेंबरमध्ये किरकोळ क्षेत्रातील महागाई पाच वर्षांच्या उच्चांकावर जाण्याची शक्यता आहे. महागाईचा दर ४ टक्क्यांच्या आत ठेवण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टाचे त्यामुळे सलग तिसऱ्या महिन्यात उल्लंघन झाल्याचे दिसेल. रॉयटर्सने केलेल्या अर्थतज्ज्ञांच्या मत चाचणीतून ही माहिती समोर आली आहे. ३ ते ८ जानेवारी या कालावधीत केलेल्या चाचणीत सहभागी सुमारे ५० अर्थतज्ज्ञांनी सांगितले की, भारतातील
वार्षिक ग्राहक महागाई डिसेंबरमध्ये वाढून ६.२० टक्क्यांवर गेल्याचे पाहायला मिळू शकेल. नोव्हेंबरमध्ये ती ५.५४ टक्क्यांवर होती.
६० टक्के अर्थतज्ज्ञांनी सांगितले की, बँकेला दिलेल्या महागाईच्या उद्दिष्टात २ टक्क्यांच्या अधिक-उण्यास वाव असतो.
महागाईच्या नियंत्रणाचा उच्च टप्पा ६ टक्क्यांवर आहे. १३ जानेवारी रोजी जाहीर होणाºया किरकोळ महागाईचा दर हा टप्पा पार करून ७.०१ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
>कांदा ठरला कारणीभूत
बोफा ग्लोबल रिसर्चच्या भारतीय अर्थतज्ज्ञ आस्था गुडवाणी यांनी सांगितले की, महागाईच्या वाढीस कांदा हा एकच प्रमुख घटक सर्वाधिक कारणीभूत आहे. इतरही काही खाद्यवस्तूंच्या किमती वाढत आहेत. तथापि, त्या आम्हाला फारशा धोकादायक वाटत नाहीत.

Web Title: Inflation rises higher than the Reserve Bank expects, will it actually go up to 2?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.