लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जुलै महिन्यात घाऊक महागाई दर म्हणजे घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) -१.३६ टक्क्यापर्यंत वाढला आहे. सलग तीन महिन्यांच्या घसरणीनंतर डब्ल्यूपीआयने वाढ नोंदवली आहे. जूनमध्ये हा निर्देशांक -४.१४ टक्क्यापर्यंत खाली आला होता. हा त्याचा ८ वर्षांचा नीचांक होता. एक वर्षापूर्वी म्हणजेच जुलै २०२२ मध्ये निर्देशांक १३.९३ टक्के इतका होता.
वाढत्या महागाई नकारात्मक असल्याने अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत असतो. जेव्हा वस्तूंचा पुरवठा त्या वस्तूंच्या मागणीपेक्षा जास्त होतो, तेव्हा नकारात्मक महागाई होते. या काळात किमती घसरतात आणि कंपन्यांचा नफा मोठ्या प्रमाणात घटतो.
नफा घटल्याने मोठमोठ्या कंपन्या कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबणे सुुरु करतात. त्यांचे काही प्लांट किंवा स्टोअर बंद करतात. अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजना सुरु करतात.
-घाऊक महागाईत दीर्घकाळ वाढ झाल्याने बहुतांश उत्पादक क्षेत्रांवर परिणाम होतो.
-घाऊक किंमत जास्त काळ उच्च पातळीवर राहिल्यास उत्पादक त्याचा बोजा ग्राहकांवर टाकतात.
-सरकार केवळ कराद्वारेच डब्ल्यूपीआय नियंत्रित करू शकते.