लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील प्रचंड वाढलेल्या महागाईने चिंतित झालेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चार महिन्यांत रेपो दरात १.४० टक्क्यांनी वाढ केली असून, कर्जांचे ईएमआय वाढत्या महागाईत आणखी वाढले जाणार आहेत. सध्या भारताची अर्थव्यवस्था वाढत्या महागाईने त्रस्त असून, महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक आटोकाट प्रयत्न करत आहे, असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. दोन अनपेक्षित घटना आणि अनेक झटक्यांनंतरही देशाची अर्थव्यवस्था जगात ‘स्थिरतेचे बेट’ आहे, असे ते म्हणाले.
‘त्या’ २ घटना कोणत्या?
मोठ्या प्रमाणात अस्थितरता असूनही, भारतीय अर्थव्यवस्था जगात वाढत आहे. सध्या महागाईने कळस गाठला असून, आता ती कमी होण्याची शक्यता आहे. मात्र महागाई सध्या अपेक्षेपेक्षा अधिक आहे. अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या दोन अनपेक्षित घटना कोणत्या होत्या, हे मात्र दास यांनी स्पष्ट केले नाही.
महागाई आणखी किती छळणार?
n युद्ध तसेच इतर अनेक घडामोडी आणि वस्तूंच्या किमतीमध्ये झालेली वाढ यामुळे चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाई कायम म्हणजे ६.७ टक्के राहण्याचा अंदाज आहे.
n जून महिन्यात आरबीआयने महागाईचा अंदाज ५.८ टक्केवरून ६.७ टक्के केला आहे. असे असले तरीही वाढलेली खरीप पेरणी, पुरवठा साखळी पूर्ववत होण्याच्या शक्यतेने महागाईचा हा दबाव काहीसा कमी होईल, असे आरबीआयने म्हटले आहे.
फटका नेमका कुणाला?
रेपा दरात वाढ केल्याने परवडणाऱ्या व मध्यम उत्पन्न श्रेणीतील घरांच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता बांधकाम कंपन्यांनी व्यक्त केली.
घरे घेण्यासाठी कमी व्याजदर ही मोठी संधी होती, मात्र आता ती
संधी संपली आहे. त्यामुळे
घरखरेदी करणाऱ्यांवर
काही प्रमाणात
परिणाम
होईल.
महागाई आणि वाढीच्या अंदाजात कोणताही बदल झालेला नसला तरी, रिझर्व्ह बँकेने महागाईबाबत स्पष्टपणे आक्रमक भूमिका घेतली आहे. वाढीवरील विश्वास महागाईला झपाट्याने मारण्यासाठी एक संधी मिळेल. महागाई आणखी वाढणार असल्याने वर्षभरात रेपो दरात आणखी ०.५० टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.
- मदन सबनवीस, मुख्य अर्थतज्ज्ञ, बँक ऑफ बडोदा
वाढत्या महागाईमुळे आरबीआयने आक्रमक भूमिका घेतली आहे. वाढीचा वेग खूपच सकारात्मक आहे. आरबीआय आगामी धोरण आढावा बैठकींमध्ये दरांमध्ये वाढ करणे सुरू ठेवेल.
- अभिक बरुआ, मुख्य
अर्थतज्ज्ञ, एचडीएफसी