पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे आता लोक सीएनजीकडे वळताना दिसत आहेत. मात्र आता सीएनजीच्या किंमतीतही सातत्याने वाढ होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये कंप्रेस्ड नेच्युरल गॅस (CNG) ची किंमत पुन्हा एकदा वाढली आहे आणि यामुळे आता येथे CNG पेट्रोलपेक्षाही महाग झाला आहे. बुधवारी सीएनजीची किंमत 2 रुपयांनी वाढून 96.50 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. तर पेट्रोल ची किंमत 96.28 रुपये आणि डिझेलची किंमत 89.47 रुपये प्रति लिटर वर पोहोचली आहे.
पेट्रोलपेक्षाही महाग सीएनजी - या वाढलेल्या किंमतीनुसार, सीएनजी पेट्रोल पेक्षा 22 पैशांनी महाग झाला आहे. ऑक्टूबरमध्ये सीएनजीच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. यात पहिल्यांदा 1 ऑक्टोबरला सीएनजीचा दर 3.50 रुपये प्रति किलोने वाढून 94.50 रुपये प्रति किलोवर पोहोचला होता.
कानपूरमधील दर - सीएनजी - 96.50 रुपये प्रति किलोपेट्रोल - 96.28 रुपये प्रति लीटरडीजल - 89.47 रुपये प्रति लीटर
का वाढत आहे CNG ची किंमत? -घरगुती गॅसच्या किमती वाढल्याने सीएनजीच्या दरात वाढ झाल्याचे मानले जाते. यामुळेच, सेंट्रल यूपी गॅस लिमिटेडनेही (सीयूजीएल) सीएनजीचा दर वाढवला आहे. 1 ऑक्टोबरपूर्वी सीएनजी 91 रुपये प्रति किलो आणि पीएनजी मानक क्यूबिक मीटर (एससीएम) मध्ये 54 रुपये होता.