नवी दिल्ली : ठोक मूल्य सूचकांकावर आधारित चलनवाढ सप्टेंबरमध्ये थोडी वाढून शून्यापेक्षा ४.५४ टक्के खाली राहिली. डाळी, भाज्या आणि कांदा महागल्याने ठोक चलनवाढ वाढली आहे; पण सलग ११ महिन्यांपासून शून्याच्या खाली राहिली आहे.
आॅगस्टमध्ये ठोक मूल्य सूचकांकावर आधारित चलनवाढ शून्य ते ४.९५ टक्के खाली आली. सप्टेंबर २०१४ मध्ये ती २.३८ टक्के होती. ठोक चलनवाढ २०१४ पासून शून्यापेक्षा खाली राहत आली आहे.
खाद्य उत्पादन वर्गात ठोक चलनवाढ सप्टेंबरमध्ये ०.६९ टक्क्याने वाढून शून्यापेक्षा खाली १.१३ टक्का राहिली. आज येथे जारी करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार वर्षभराच्या तुलनेत कांद्याचे ठोक भाव ११३.७० टक्के, तर डाळींचे भाव ३८.५६ टक्क्यांनी जास्त राहिले. भाज्यांचे भाव मात्र वर्षाच्या तुलनेत ९.४५ टक्क्यांनी घटले आहेत. आॅगस्ट महिन्यात भाज्यांच्या वर्गात चलनवाढ शून्य ते २१.२१ टक्के खाली होती.
इंधन आणि विजेच्या वर्गात चलनवाढ शून्य ते १७.७१ टक्के खाली राहिली. अन्य वर्गात ही चलनवाढ शून्य ते १.७३ टक्का कमी राहिली. डाळी आणि कांद्याशिवाय सप्टेंबरमध्ये अंडी (२.०२ टक्के), दूध (२.१६ टक्के) आणि गव्हाचे ठोक भाव ३८.५६ टक्क्यांनी वाढले. याच काळात बटाट्याचे भाव मात्र ५७.३४ टक्क्यांनी कमी राहिले. दरम्यान, जुलैच्या ठोक चलनवाढीबाबत संशोधित आकडे जारी करण्यात आले असून, त्यानुसार चलनवाढ शून्यापेक्षा खाली ४.० टक्के करण्यात आली आहे.
ठोक क्षेत्रातील महागाईही वाढली
ठोक मूल्य सूचकांकावर आधारित चलनवाढ सप्टेंबरमध्ये थोडी वाढून शून्यापेक्षा ४.५४ टक्के खाली राहिली. डाळी, भाज्या आणि कांदा महागल्याने ठोक चलनवाढ वाढली आहे
By admin | Published: October 14, 2015 11:10 PM2015-10-14T23:10:47+5:302015-10-14T23:10:47+5:30