Join us

पाम तेलामुळे प्रत्येक घरात वापरल्या जाणाऱ्या 'या' उत्पादनांच्या किमती झपाट्याने वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 5:11 PM

inflation : मेहता यांच्या म्हणण्यानुसार, पाम तेलाच्या वाढत्या किमतींमुळे इतर अनेक उत्पादनांच्या किमतीतही वाढ दिसून येत आहे. मात्र, त्यांनी इंडोनेशियाने निर्यात बंद करणे ही कंपनीसाठी मोठी चिंतेची बाब असल्याचे म्हटले नाही.

नवी दिल्ली : पाम तेल आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे फास्ट-मुव्हिंग कंझ्युमर गुड्स (FMCG) उद्योगातील किमती आणखी वाढतील, असे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे (HUL)  मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एमडी संजीव मेहता यांनी म्हटले आहे. मनीकंट्रोलला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, जोपर्यंत वस्तूंच्या किमती कमी होत नाहीत, तोपर्यंत एफएमसीजी उत्पादनांच्या किमती वाढतच राहतील.

"किंमत वाढण्याचे नेमके प्रमाण किती असेल हे सांगणे कठीण आहे, परंतु ज्या पद्धतीने वस्तूंच्या किंमती वाढत राहिल्या तर किंमत वाढतच राहील" असे संजीव मेहता म्हणाले. ते म्हणाले की, महागाईमुळे मार्जिन कमी होईल पण त्यामुळे रिकव्हरी होईल. पाम तेलाच्या वाढत्या किमतींमुळे त्वचा स्वच्छ करणाऱ्या उत्पादनांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. त्यानंतर कच्च्या तेलाच्या डेरिव्हेटिव्ह्जमध्ये वाढ झाल्यामुळे लॉन्ड्री पावडरच्या किमतीत वाढ होईल, असे संजीव मेहता यांनी म्हटले आहे. 

मेहता यांच्या म्हणण्यानुसार, पाम तेलाच्या वाढत्या किमतींमुळे इतर अनेक उत्पादनांच्या किमतीतही वाढ दिसून येत आहे. मात्र, त्यांनी इंडोनेशियाने निर्यात बंद करणे ही कंपनीसाठी मोठी चिंतेची बाब असल्याचे म्हटले नाही. ते म्हणाले की, एचयूएल वापरत असलेल्या पाम तेलावर बंदी घालण्यात आलेली नाही. पॅकेज केलेल्या ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्या आर्थिक वर्ष 2021 पासून महागाईशी झुंज देत आहेत. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे परिस्थिती अधिकच बिघडली आहे आणि अनेक महत्त्वाच्या वस्तूंसाठी पुरवठा टंचाई निर्माण झाली आहे. रशिया-युक्रेन युद्ध थांबले तर वस्तूंच्या किमतीही नियंत्रणात येतील, असा विश्वास संजीव मेहता यांनी व्यक्त केला.

इंडोनेशियाने निर्यातीवर घातली बंदी पाम तेलाचा एक प्रमुख निर्यातदार म्हणून ओळखणाऱ्या इंडोनेशियाने गेल्या आठवड्यात पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. कारण  इंडोनेशिया पुरवठा मर्यादा आणि महागाईशी संघर्ष करत आहे. भारतातील एकूण खाद्यतेलाच्या वापरामध्ये पाम तेलाचा वाटा 40 टक्के आणि आयातीपैकी 60 टक्के आहे. एफएमसीजी आणि आणि अन्न आणि पेय उद्योगांसाठी ही एक प्रमुख वस्तू आहे. भारत प्रामुख्याने इंडोनेशिया आणि मलेशिया येथून आयात करतो.

टॅग्स :महागाईतेल शुद्धिकरण प्रकल्पव्यवसाय