Lokmat Money > बिझनेस न्यूज > महंगाई डायन... दुधानेही वटारले डाेळे, दुग्धजन्य पदार्थांची आयात शक्य

महंगाई डायन... दुधानेही वटारले डाेळे, दुग्धजन्य पदार्थांची आयात शक्य

आवश्यक खाद्यान्नांच्याही किमती वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2023 11:02 AM2023-04-08T11:02:03+5:302023-04-08T11:02:16+5:30

आवश्यक खाद्यान्नांच्याही किमती वाढल्या

Inflation witch... Milk is also consumed, import of dairy products is possible | महंगाई डायन... दुधानेही वटारले डाेळे, दुग्धजन्य पदार्थांची आयात शक्य

महंगाई डायन... दुधानेही वटारले डाेळे, दुग्धजन्य पदार्थांची आयात शक्य

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : गेल्या वर्षभरात डाळ, तांदूळ, गव्हाचे पीठ, खाद्यतेलासह आता दूध, दही, पनीर, तूप इत्यादींचेही भाव वाढले आहेत. जवळपास प्रत्येक वस्तू १० ते १५ टक्क्यांनी महाग झाल्या आहेत. दुधाच्या मागणीत वाढ झाली असून, त्या तुलनेत पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात दुधाचे दर आणखी वाढू शकतात. दुग्धजन्य पदार्थांची मागणी व किमतींवर सरकार लक्ष ठेवून आहे. गरज भासल्यास या पदार्थांची आयात करण्याचा सरकारचा विचार आहे. तसे झाल्यास २ वर्षांमध्ये प्रथमच डेअरी उत्पादनांची आयात ठरणार आहे. 

दुधाची मागणी ८ ते १०% वाढली आहे. सध्या देशात दुधाचा पुरवठा सुरळीत आहे. स्किम्ड दूध पावडरचाही पुरेसा साठा आहे. मात्र, लाेणी व तुपाचा साठा घटला आहे. त्यामुळे गरज भासल्यास त्यांची आयात करण्याबाबत विचार करू, असे केंद्रीय पशुसंवर्धन व डेअरी सचिव राजेश कुमार सिंह यांनी सांगितले.

दूध पुरवठ्यावर सरकारचे लक्ष

यंदा उन्हाळ्यापूर्वी मागणी आणि पुरवठ्यात तफावत जाणवत आहे. त्यामुळे अनेक डेअरी संघांनी दुधाच्या उत्पादनांची आयात करण्याची मागणी केली आहे. आम्ही याकडे लक्ष ठेवून आहाेत, असे सरकारने म्हटले आहे. २२.१काेटी टन दुधाचे उत्पादन २०२१-२२ या वर्षात झाले. 

२२ खाद्यपदार्थांच्या किमती

  • वस्तू    २०२०    २०२१    २०२२
  • तांदूळ    ३४.२५    ३५.९८    ३७.०३ 
  • गहू    २८.३६    २७.२५    ३०.१५ 
  • गव्हाचे पीठ    ३०.८१    ३०.७५    ३४.५० 
  • चणा डाळ    ६८.५९    ७५.२६    ७३.६६ 
  • उडीद डाळ    १०१.८०    १०७.९०    १०६.६० 
  • मूग डाळ    १०३.५०    १०३.९०    १०२.६० 
  • मसूर डाळ    ७४.७४    ८८.७५    ९६.२१ 
  • शेंगदाणा तेल    १४७    १७६.३०    १८९ 
  • माेहरी तेल    १२३.३०    १७०.७०    १८२ 
  • वनस्पती तेल    ९२.२७    १३१    १५०.२० 
  • साेयाबीन तेल    १०२.८०    १४७.३०    १५८.४० 
  • सूर्यफूल तेल    ११४.२०    १६४.४०    १७८.२० 
  • पामतेल    ९२.१४    १२८.३०    १३४.८० 
  • बटाटा    ३१.२५    २१.३४    २५.२० 
  • कांदा    ३५.८८    ३२.५२    २८.०० 
  • टाेमॅटाे    ३३.६६    ३२.६३    ३६.६१ 
  • साखर    ३९.८५    ४०.६२    ४१.८७ 
  • गूळ    ४७.८९    ४७.६८    ४९.३१ 
  • दूध (प्रतिलिटर)    ४६.५२    ४९.११    ५२.८१ 
  • चहा (सुटा)    २२४.७०    २७९.८०    २८२.५० 
  • मीठ    १६.२७    १८.०९    २०.२५


खाद्यतेल उतरले, पण डाळी भडकल्या

प्रशांत तेलवाडकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: मागील दोन वर्षांत खाद्यतेलाचे दर प्रचंड वाढले होते. मात्र, आता करडी तेलाचे भाव लिटरमागे १० रुपयांनी कमी झाले. अन् तीन महिन्यांत अन्य खाद्यतेलांचे भाव २५ रुपयांपर्यंत घटले. पण याच वेळी डाळींचे भाव मात्र वधारले आहेत. आता काय नुसते खाद्यतेलच प्यायचे का, असा सवाल ग्राहक विचारत आहेत. 
गेल्या तीन महिन्यांत तेलाचे भाव २५ ते ५० रुपये लिटरमागे कमी झाले. अन्य खाद्यतेलांचे भावही २० ते २५ रुपयांनी घटले.  मात्र, विविध कारणांनी उत्पादन घटल्यामुळे डाळींचे भाव ५ ते १० रुपयांनी वाढले आहेत.

खाद्यतेल : किमती (प्रतिलिटर)

  • करडी    ₹२२५    ₹२१५  
  • शेंगदाणा    ₹१८५    ₹१८०
  • सूर्यफूल    ₹१४५    ₹१४०
  • सोयाबीन    ₹१२०    ₹११५
  • सरकी    ₹१२५    ₹१२०
  • पाम    ₹११०    ₹१०५
  • तीळ    ₹२०५    ₹२००


डाळी : किमती (प्रतिकिलो)

  • तूर डाळ    ₹११०    ₹१२०
  • हरभरा डाळ    ₹६४    ₹६८
  • मूग डाळ    ₹१००    ₹११२
  • उडीद डाळ    ₹९४    ₹१०२
  • मसूर डाळ        ₹९०    ₹९२

Web Title: Inflation witch... Milk is also consumed, import of dairy products is possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :milkदूध