Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्टार्टअप, फिनटेकमध्ये महिला संचालक तिप्पट, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

स्टार्टअप, फिनटेकमध्ये महिला संचालक तिप्पट, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

Business News: स्टार्टअप आणि फिनटेक कंपन्यांतील महिला संचालकांची संख्या मागील दहा वर्षांत तिप्पट वाढली आहे, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. तामिळनाडूत ही संख्या चारपट वाढल्याचे सीतारामन यांनी म्हटले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 11:16 AM2024-09-07T11:16:27+5:302024-09-07T11:19:03+5:30

Business News: स्टार्टअप आणि फिनटेक कंपन्यांतील महिला संचालकांची संख्या मागील दहा वर्षांत तिप्पट वाढली आहे, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. तामिळनाडूत ही संख्या चारपट वाढल्याचे सीतारामन यांनी म्हटले.

Information from Finance Minister Nirmala Sitharaman, triple the number of women directors in startups, fintech | स्टार्टअप, फिनटेकमध्ये महिला संचालक तिप्पट, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

स्टार्टअप, फिनटेकमध्ये महिला संचालक तिप्पट, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

नवी दिल्ली  - स्टार्टअप आणि फिनटेक कंपन्यांतील महिला संचालकांची संख्या मागील दहा वर्षांत तिप्पट वाढली आहे, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. तामिळनाडूत ही संख्या चारपट वाढल्याचे सीतारामन यांनी म्हटले.

‘फिक्की-एफएलओ’च्या चेन्नई शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सीतारामन यांनी सांगितले की, महिला सबलीकरणासाठी सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. त्याद्वारे अनेक क्षेत्रांत महिलांची भागीदारी वाढविली जात आहे. कॉर्पोरेट जगताचाही त्यात समावेश आहे. 

वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रासह स्टार्टअपमध्ये महिलांची संख्या तेजीने वाढत आहे. भारतात जवळपास १११ युनिकॉर्न (१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक मूल्य असलेली स्टार्टअप) आहेत. त्यातील १८ टक्के युनिकॉर्नचे नेतृत्व महिला करतात. २०१४ मध्ये महिला संचालकांची संख्या २.५८ लाख होती. ती ऑगस्ट २०२४ मध्ये ३.४ टक्के वाढून ८.८३ लाख झाली. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध सबलीकरण योजनांमुळे महिला कॉर्पोरेट जगतात आत्मविश्वासाने वावरत आहेत. 

तामिळनाडूत सर्वाधिक वाढ
- तमिळनाडूत २०१४ साली महिला संचालकांची संख्या १५,५५० होती. २०२४ मध्ये ती सर्वाधिक ४.३ टक्के वाढून ६८,००० झाली. 
- वित्त वर्ष २०१३-१४ मध्ये महिला सबलीकरणासाठी अर्थसंकल्पात ९७,१३४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. 
- २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात ती तिप्पट वाढून ३.१० लाख कोटी झाली.

Web Title: Information from Finance Minister Nirmala Sitharaman, triple the number of women directors in startups, fintech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.