Join us

Infosys Co-founder Kris Gopalakrishnan : नारायण मूर्ती, सुधा मूर्ती यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत आहे Infosysचे 'हे' सह-संस्थापक; किती संपत्तीचे आहेत मालक?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 9:59 AM

Infosys Co-founder Kris Gopalakrishnan : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांच्याबद्दल तुम्हाला कल्पना असेलच. परंतु इन्फोसिसच्या आणखी एका संस्थापकाबद्दल तुम्हाला माहितीये का? महत्त्वाचं म्हणजे त्यांची संपत्ती ही नारायण मूर्ती यांच्यापेक्षाही अधिक असल्याची माहिती समोर आलीये.

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांच्याबद्दल तुम्हाला कल्पना असेलच. परंतु इन्फोसिसच्या आणखी एका संस्थापकाबद्दल तुम्हाला माहितीये का? महत्त्वाचं म्हणजे त्यांची संपत्ती ही नारायण मूर्ती यांच्यापेक्षाही अधिक असल्याची माहिती समोर आलीये. हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२४ नुसार नारायण मूर्ती यांची एकूण संपत्ती ३६,६०० कोटी रुपये आहे. यासहच ते बंगळुरूतील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेत. 

परंतु इन्फोसिसचे आणखी एक सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन त्यांच्यापेक्षाही श्रीमंत ठरलेत. गोपालकृष्णन यांची एकूण संपत्ती ३८,५०० कोटी रुपये आहे. २००७ ते २०११ या कालावधीत ते इन्फोसिसचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टरही होते. २०११ ते २०१४ या कालावधीत त्यांनी वाईस चेअरमनपदाची जबाबादारीही सांभाळली होती.

गोपालकृष्णन (६९) सध्या अॅक्सिलर व्हेंचर्सचे चेअरमन आहेत. अॅक्सिलर व्हेंचर्स ही स्टार्टअप एक्सीलरेटर आहे ज्यानं GoodHome, Kaagaz आणि EnKash  सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. क्रिस गोपालकृष्णन यांनी आयआयटी मद्रासमधून फिजिक्स आणि कम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. २०११ मध्ये त्यांना पद्मभूषण या देशातील तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. सुधा गोपालकृष्णन यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे.

आयआयटी मद्रासशीही जोडलेले

इन्फोसिसच्या वेबसाइटनुसार, गोपालकृष्णन आयआयटी मद्रास आणि आयआयएम बंगळुरूच्या संचालक मंडळात आहेत. ते आयआयआयटी, बंगळुरूच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटच्या विश्वस्त मंडळावरही आहेत.

इन्फोसिसची सुरुवात १९८१ मध्ये सात इंजिनिअर्सनं एका खोलीतून केली. त्यानंतर ही कंपनी पुण्याहून बंगळुरूला स्थलांतरित झाली. इन्फोसिसचे सात सहसंस्थापक नारायण मूर्ती, नंदन निलेकणी, क्रिस गोपालकृष्णन, एसडी शिबूलाल, के. दिनेश आणि एन. एस. राघवन यांचा समावेश आहे. सुमारे २५० डॉलरच्या सुरुवातीच्या भांडवलापासून सुरू झालेलं स्वप्न आज सुमारे ८० अब्ज डॉलरच्या बाजार भांडवलासह जगातील सर्वात मोठ्या आयटी सेवा कंपन्यांपैकी एक आहे. 

टॅग्स :इन्फोसिसनारायण मूर्तीसुधा मूर्ती