Join us  

सुधा मूर्ती विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम तयार करणार! NCERT ने दिली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 2:58 PM

देशातील सुप्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचे नाव NCERT पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

देशातील सुप्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचे नाव NCERT पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. केंद्र सरकारने अधिसूचना जारी करून शालेय अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी आणि नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या NCERT समितीमध्ये सुधा मूर्ती यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. सुधा मूर्ती व्यतिरिक्त, पॅनेलमध्ये पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विबेक देबरॉय, सल्लागार समितीचे सदस्य संजीव सन्याल, आरएसएसचे विचारवंत चामू कृष्ण शास्त्री आणि गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचा समावेश आहे.

शाळेत जायच्या वयात सुरू केली कंपनी, कोट्यवधींचा टर्नओव्हर; मोठ्या-मोठ्या लोकांना दिलाय जॉब

NCERT ने मुलांचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी १९ सदस्यांची राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापन सामग्री समिती (NCTC) स्थापन केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्थेचे कुलपती महेशचंद्र पंत यांना या समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. 

ही समिती देशातील शालेय शिक्षणासाठी अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक विकसकांसाठी रोडमॅप तयार करेल. विशेष म्हणजे २०२४-२५ या शैक्षणिक सत्रापासून नवीन अभ्यासक्रम आणि पुस्तके आणण्याचा सरकारचा विचार आहे. सरकारने आता ही जबाबदारी या समितीकडे सोपवली आहे. ही समिती इयत्ता ३ ते १२ वी साठी शालेय अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके आणि अध्यापन साहित्य विकसित करणार आहेत.

सुधा मूर्ती या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. टाटांच्या पहिल्या महिला अभियंता सुधा मूर्ती या सुप्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. बकुला फॉल्स स्लोली, हाऊ आय टीट माय ग्रॅडमदर टू रीड आणि इतर कथा, महाश्वेता, डॉलर बहू आणि टीन थाउजंड स्टिचेस यासारख्या अनेक लोकप्रिय पुस्तकांच्या त्या लेखिका आहेत. मूर्ती या त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. त्यांचे प्रेरणादायी भाषणं सोशल मीडियावर व्हायरल होतात, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :सुधा मूर्तीइन्फोसिस