नवी दिल्लीः आयटी सेक्टरमधली दिग्गज कंपनी असलेली इन्फोसिस लवकरच 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच कॉग्निझंटनं 13 हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे आयटी कंपन्यांचा नोकरकपातीचा हा सिलसिला सुरूच आहे. ज्यांना जास्त पगार आहे, त्यांच्यावर पहिल्यांदा ही कुऱ्हाड कोसळणार आहे. कंपनी आपल्या जेएल 6 विभागामध्ये कार्यरत असलेल्या 2200 कर्मचाऱ्यां(10 टक्के)ना नोकरीवरून काढून टाकणार आहे.
या विभागात सर्वाधिक भरमसाट पगार असलेले कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीजवळ आतापर्यंत 3092 कर्मचारी जेएल 6, जेएल 7 आणि जेएल 8 विभागामध्ये कार्यरत आहेत. कंपनी जेएल3, जेएल4 आणि जेएल5 विभागातल्या दोन ते पाच टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. अशा प्रकारे कंपनी जवळपास 4 हजार ते 10 हजारांपर्यंत कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. तसेच या तिमाहीत कंपनी 12200 कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे.
50 वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सहाय्यक उपाध्यक्ष, उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष, कार्यकारी उपप्रमुख अशा पदांवरच्या जवळपास 50 जणांना नारळ देण्यात येणार आहे. कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरीवरून लोकांना काढून टाकण्यात येणार आहे. गेल्या दोन तिमाहीत कंपनीनं अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिलेला आहे. आतापर्यंत टेक सर्व्हिसमध्ये कार्यरत असलेल्या 18 टक्के कर्मचारी आणि इतर 19.4 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलेलं आहे.
धक्कादायक! कॉग्निझंटनंतर आता इन्फोसिस 12 हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ
आयटी सेक्टरमधली दिग्गज कंपनी असलेली इन्फोसिस लवकरच 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 03:36 PM2019-11-05T15:36:54+5:302019-11-05T15:42:34+5:30