नवी दिल्ली - आयटी सेक्टरमधली दिग्गज कंपनी असलेल्या इन्फोसिसमधील करोडपती कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये कंपनीमधील तब्बल 74 कर्मचारी करोडपती झाले आहेत. गेल्या वर्षी करोडपती कर्मचाऱ्यांची संख्या ही 64 होती. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, इन्फोसिसच्या व्हाइस प्रेसिडेंट आणि सिनिअर व्हाइस प्रेसिडेंट स्तरावरील 74 अधिकाऱ्यांचा करोडपतीच्या लिस्टमध्ये समावेश झाला आहे. इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलिल पारेख यांच्या पॅकेजमध्ये 2019-20 या आर्थिक वर्षात 39 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे कंपनीच्या चेअरमननी स्वच्छेने कोणतेही वेतन न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
2018-19 या आर्थिक वर्षात पारेख यांचे पॅकेज 24.67 कोटी इतके होते. इन्फोसिसने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या कर्मचाऱ्यांना स्टॉक इसेंटिव्ह (शेअर प्रोत्साहन भत्ता) मिळाल्यामुळे करोडपतींची संख्या वाढली आहे. इन्फोसिसच्या वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या पॅकेजमध्ये फिक्स पे, व्हेरिएबल पे, रिटायरमेंटवर मिळणाऱ्या सुविधा आणि स्टॉक आदीचा समावेश असतो. पण कंपनीतील लिडरशिप स्तरावरील कर्मचाऱ्यांचे पॅकेज समान आहे. तसेच 2019 मध्ये कोणालाही प्रमोशन मिळाले नाही.
इन्फोसिस कंपनीचे चेअरमन नंदन निलेकणी यांनी स्वच्छेने कोणतेही वेतन न घेण्याचा निर्णय घेतला आहे. पारेख यांच्या बरोबरच कंपनीचे सीओओ युबी प्रवीण राव यांचे वेतन गेल्या वर्षाहून 17.1 टक्क्यांनी वाढून ते 10.6 कोटी झाले आहे. गेल्या वर्षी इन्फोसिस कर्मचार्यांच्या पगारामध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली होती. आधी 6.2 लाख रुपये होते. मात्र वाढ झाल्यावर 6.8 लाख रुपयांवर गेली आहे. भारतातील कर्मचार्यांची वेतनवाढ सरासरी 7.3 टक्के आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनाची लढाई लवकरच जिंकता येणार; 'हे' औषध प्रभावी ठरणार
Mitron युजर्ससाठी अलर्ट! त्वरित डिलीट करा अॅप नाहीतर...
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'या' राज्याचा रेकॉर्ड; तब्बल 4.85 कोटी लोकांचं केलं स्क्रिनिंग
Cyclone Nisarga : अरविंद केजरीवालांनी केलं उद्धव ठाकरेंसाठी ट्विट; म्हणाले...