Join us

Infosys उघडणार नोकऱ्यांचा पेटारा; या वर्षी कंपनी 45 हजार फ्रेशर्सची भरती करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 8:55 PM

Infosys to hire 45000 freshers this year : इन्फोसिसकडून ही घोषणा अशा वेळी आली आहे, ज्यावेळी कंपनीचा अॅट्रिशन रेट म्हणजेच कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दर लक्षणीय वाढला आहे आणि आयटी कंपन्यांमध्ये चांगले टेक्नॉलॉजी टॅलेंट घेण्याची स्पर्धा आहे. 

नवी दिल्ली : जर तुम्ही फ्रेशर्स असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. दरम्यान, देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने (Infosys) बुधवारी सांगितले की, या वर्षी कंपनीमध्ये जवळपास 45,000 फ्रेशर्सची भरती करणार आहे. इन्फोसिसकडून ही घोषणा अशा वेळी आली आहे, ज्यावेळी कंपनीचा अॅट्रिशन रेट म्हणजेच कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दर लक्षणीय वाढला आहे आणि आयटी कंपन्यांमध्ये चांगले टेक्नॉलॉजी टॅलेंट घेण्याची स्पर्धा आहे.  (Infosys to hire 45000 freshers this year)

इन्फोसिसचे सीओओ (UB) प्रवीण राव यांनी सांगितले की, "बाजारातील सर्व क्षमतेचा लाभ घेण्यासाठी आम्ही आमच्या कॉलेज ग्रॅज्युएट हायरिंग प्रोग्रॉमला या वर्षी वाढवून 45,000 पर्यंत घेऊन जाणार आहोत.  याव्यतिरिक्त, आम्ही आमच्या कर्मचार्‍यांच्या गरजा पूर्ण करणे सुरू ठेवणार आहोत, ज्यात हेल्थ आणि वेलनेसचे उपाय, रिस्किलिंग प्रोग्रॉम आणि करिअर वाढीच्या संधी यांचा समावेश आहे."

Infosys Q2 Results: नफा 11.9% वाढून 5,421 कोटी रुपयेइन्फोसिसने बुधवारी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे (2021-22) आर्थिक परिणाम जाहीर केले. चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 11.9 टक्क्यांनी वाढून 5,421 कोटी रुपये झाला. यासह, कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 4,845 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. 

याचबरोबर, शेअर बाजारांना पाठवलेल्या माहितीमध्ये कंपनीने म्हटले आहे की, तिमाही दरम्यान कंपनीची कमाई 20.5 टक्क्यांनी वाढून 29,602 कोटी रुपये झाली आहे, जी एक वर्षा आधी याच तिमाहीत 24,570 कोटी रुपये होती. 

टॅग्स :इन्फोसिसनोकरी